वानरासोबत ड्रायव्हिंग photo credits : twitter

भूतदया किंवा प्राण्यांसोबत खेळणं हा काही लोकांसाठी उत्तम स्ट्रेस बस्टर आहे. पण कर्नाटकातील एका प्रादेशिक बस वाहकाचा वानरासोबत ड्रायव्हिंग करण्याचा व्हायरल व्हिडीओ त्याला चांगलाच महागात पडला आहे. कर्नाटक राज्य सडक परिवहन निगम (KSRTC) ने व्हायरल  झालेल्या व्हिडीओनंतर वाहकावर  कडक कारवाई करण्यात आली आहे.

एखाद्या सिनेमात पाहावं तसं वानर कर्नाटक राज्य सड़क परिवहन निगम (KSRTC)च्या बसमध्ये स्टिअरिंगवर बसले  होते. बस चालकही वानरासोबत मज्जा करत गाडी चालवण्याचा आनंद लुटत होता. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार १ ऑक्टोबर चा आहे. नेटकऱ्यांनी या प्रकारावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींना हा प्रकार प्रवाशांच्या जीवाशी खेळ वाटत होता तर प्राण्यांसोबत आपुलकीनं वागणं चुकीचं कसं ? असा प्रश्नही काहींनी विचारला आहे.

 

KSRTC च्या डिव्हिजनल सिक्युरिटी कमिटीने चालक आणि वाहकाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. तो पर्यंत चालकाला कोणत्याही बस ड्युटी वर न पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी चालकाची चूक आढळल्यास त्यावर करवाई होऊ शकते. असे परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.