Paragliding करत तरूणाने 8000 फीट उंचीवर गायलं Maa Tujhhe Salaam! पहा Viral Video
Paragliding | PC: Facebook

सोशल मीडीयामध्ये देशभक्तीशी निगडीत अनेकांचे व्हिडिओ वायरल होतात. या व्हिडिओंना पाहून अनेकांच्या मनात देशभक्तीची भावना द्विगुणित होते. सध्या याचमध्ये एक देशभक्ती दाखवणार्‍या गायकाच्या व्हिडिओची भर पडली आहे. सुमारे 8000 फूट उंचीवर एक तरूण 'मां तुझे सलाम' (Maa Tujhe Salaam) गात असल्याचं या व्हिडिओ मध्ये पहायला मिळत आहे.  हे देखील नक्की वाचा: Paragliding Turns Fatal: पॅराग्लायडिंग करताना एका तरुणाचा उंचावरून पडून जागीच मृत्यू, पोलिसांनकडून तपास सुरू .

पॅरा ग्लायडिंगचा आनंद घेत हा तरूण गाणं देखील गात आहे. छोट्या गिटार वर तो हे गाणं गात एंजॉय करत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट पहायला मिळत आहे. अनेकदा ए आर रेहमान यांचं हे गाणं त्यांच्या आवाजात ऐकताना अंगावर काटे उभे राहतात. पण या तरूणाचा प्रयत्नदेखील शहारा आणणारा आहे. हे देखील नक्की वाचा: मुस्लिम व्यक्तीनं गायलेल्या Mahabharat Title Song चा व्हिडिओ वायरल; नेटकर्‍यांनी केलं आवाजासह संस्कृत उच्चारणाचं कौतुक.

'मां तुझे सलाम' गाण्याचा व्हिडिओ  

फेसबूकवर 'वन बीट' नावाने एक पेज बनवण्यात आले आहे. त्यांनी सोशल मीडीयामध्ये हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ ला 2 लाखांच्या पार व्ह्यूज आहेत. तर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.