Photo Credit: X

पावसाळ्यात कीटकांव्यतिरिक्त साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचा धोका अनेकदा वाढतो. पावसाळ्यात हे प्राणी आपल्या खड्ड्यांतून बाहेर पडतात आणि सुरक्षित ठिकाणांच्या शोधात लोकांच्या घराकडे वळू लागतात, त्यामुळे या ऋतूत सतर्कता बाळगणे आवश्यक आहे, कारण हे जीव कधी आणि कुठे लपतील हे सांगणे कठीण आहे. अशा परिस्थितीत कपडे, शूज, हेल्मेट इत्यादी घालण्यापूर्वी एकदा नीट झाडून बगा मगच घाला. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक किंग कोब्रा बुटाच्या आत लपलेला दिसत आहे, जेव्हा त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा तो फना पसरवून हल्ला करण्याच्या मूडमध्ये आला.

@MindhackD नावाच्या X खात्यावरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे- सावधान. या पावसाळ्यात, पाय थेट शूज आणि सँडलमध्ये घालू नका, ते कमीतकमी दोनदा उलटा, जमिनीवर हलके आपटून त्यांची चाचणी घ्या, त्यानंतरच ते घालण्यासाठी तुमचे पाय त्यात ठेवा. हेही वाचा: Python Danger Video: सुरत मध्ये शेतात दिसला अजगर; प्रसंगावधान राखत केली सुटका

 

यावर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले आहे - एक व्यक्तीच्या तर  हेल्मेटमध्ये लपला होता. त्याच वेळी, दुसरा म्हणतो - भाऊ, पावसात सावध रहा. किंग कोब्रा साप बुटाच्या आत लपून बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.बुटात साप असल्याचे पाहून कुटुंबीयांनी सर्प मित्राला बोलावले व जेव्हा स्नेक कॅचरने कोब्रा ल बाहेर काढण्यासाठी बुटा मध्ये स्टिक टाकली तसा तो कोब्रा तो फना पसरवून हल्ला करायला लागला,हे दृश्य पाहून घरातील सदस्य घाबरून ओरडू लागले.