वय हे खरंतर केवळ एक आकडा. मनात आणि अंगात फक्त जोश हवा. तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकता. हे सांगणाराच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. ज्यामध्ये एक वृद्ध जोडपे नवरात्री (Navratri) दरम्यान दांडीया नृत्य (Dandiya Dance) करताना दिसत आहे. इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सर (Instagram Influencer) तनिश शाहने शेअर केलेल्या या व्हिडिओला 13.4 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. त्याची संख्या अद्यापही वाढतच आहे. वापरकर्ते या व्हिडिओखाली (Garba Dance Garba Dance) मजेशी प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये, पारंपरिक गरबा पोशाख परिधान केलेले वृद्ध जोडपे दांडिया नृत्य करत असताना उत्साह आणि आनंद वाढवत आहेत. त्यांच्यातील हरहुन्नरीपणा आणि अधिक उत्साहाने प्रेक्षकांना चकित केले आहे. क्लासिक काळा कुर्ता आणि पायजामा परिधान केलेल्या शाह यांच्यासमवेत वृद्ध माणूस त्याच्या नृत्य कौशल्याचे अधिक प्रात्यक्षिक दाखवत आहे. हे जोडप्याने तालबद्धपणे नृत्य करताना, आकर्षण आणि आनंद व्यक्त करताना व्हिडिओची सुरुवात होते.
सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करताना एन्फ्लूएन्सर तनिश शाह याने या पोस्टला कॅप्शन दिले आहे की, 'नवरात्री हा आमच्या गुजराती लोकांसाठी केवळ एक सण नाही तर एक भावना आहे! या जादूच्या क्षणांवर तुम्ही मात करू शकत नाही ". त्यानंतर या जोडप्याच्या आयुष्याबद्दलच्या उत्साहाने प्रभावित झालेल्या वापरकर्त्यांच्या कौतुकाने पोस्टखाली असलेला कमेंट बॉक्स भरुन गेला आहे.
व्हिडिओ
View this post on Instagram
रंगीबेरंगी पारंपारिक गरबा पोशाख परिधान केलेले, हे जोडपे सहजतेने प्रत्येक डान्स स्टेप पार करतात. दरम्यान, या जोडप्याचा आनंद आणि एकजुटीचे हृदयस्पर्शी प्रदर्शन इंटरनेटवर सोशल मीडिया वापरकर्त्यांना चांगलेच आवडले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सकारात्मक टिप्पण्यांचा केल्या जात आहेत. अनेकांनी त्यांच्या उर्जेबद्दल आणि उत्कटतेबद्दल कौतुक व्यक्त केले, तर काहींना त्यांच्या नृत्यावरील प्रेमाने प्रेरित केले. "वय ही फक्त एक संख्या आहे," एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, तर दुसऱ्याने नमूद केले, "-दोघांनाही निरोगी आयुष्य लाभले आहे, अर्थातच त्यासाठी ते दररोज व्यायाम करत असतील." या जोडप्याचा व्हायरल परफॉर्मन्स एक आठवण करून देतो की नृत्य ही एक सार्वत्रिक भाषा आहे जी वयाच्या पलीकडे जाते आणि सर्वांना आनंद देते.