(Photo Credits: X)

Viral Video: अनेकवेळा लोक एखाद्या खास प्रसंगाला साजरे करण्यासाठी दारू पितात, पण काही वेळा उत्सवादरम्यान लोक इतकी दारू पितात की, त्यानंतर त्यांना कशाचेही भान राहत नाही. त्याचबरोबर अनेकांना दारू पिण्याचे व्यसन असते आणि दारू पिल्यानंतर ते नशेच्या आहारी जाऊन काहीही  कृत्ये करू लागतात. यानंतर त्यांना घरी सोडण्यासाठी कोणाची तरी सोबत लागते. दरम्यान, सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस दारूच्या नशेत इतका धुंद होतो की, तो नीट उभा राहू शकत नव्हता, त्यानंतर त्याचा  पाळीव बैल त्याला सुखरूप घरी घेऊन जातो. हा व्हिडिओ @arvindchotia नावाच्या व्यक्तीने X वर शेअर केला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे – हे ब्राझील आहे. मद्यपान केल्यानंतर त्या माणसाचे भान हरपले. त्याचा बैल सचेतन आहे. त्याला सुखरूप घरी नेले. बैल पाळला नाही तर गाय ठेवा. या व्हिडिओला शेअर केल्यापासून 424k व्ह्यू मिळाले आहेत. हे देखील वाचा: Crab and Puppy Viral Video: खेकडा आणि श्वानच्या पिलाची गोंडस मैत्री, व्हायरल व्हिडिओ पाहून लोक म्हणाले- आजवरची सर्वात विचित्र मैत्री

येथे पाहा, बैलाचा व्हिडीओ

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दारू पिऊन पूर्णपणे नशेत असल्याचे दिसून येत आहे. नशेत असल्याने त्याची पावले थबकत आहेत, तर त्याचा पाळीव बैलही त्याच्यासोबत दिसत आहे. या अवस्थेत बैल त्या व्यक्तीला घरी नेण्याचा प्रयत्न करत आहे. बैल त्या माणसाला डोक्याने  ढकलून सुखरूप घरी घेऊन जात आहे. हा व्हिडिओ वेगाने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे आणि लोक हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत.