(Archived, edited, representative image)

जगात बहुतांश कपल्स असे आहेत ते पालक होऊ शकत नाही. अशातच ते स्पर्म डोनर यांची मदत घेतात. त्यामुळे ते आपल्या परिवाराला पुढे वाढवू शकतात. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याने या मुद्दावर विक्की डोनर नावाचा एक सिनेमा सुद्धा केला आहे. त्यामुळे असे कळते की, स्पर्म डोनर केल्याने कशा पद्धतीने पालक बनता येते.ब्रिटनमधील एक व्यक्ती सध्या खूप चर्चेत आहे. वास्तविक, ही व्यक्ती स्पर्म डोनर आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या व्यक्तीला आतापर्यंत 129 मुले झाली आहेत. त्याचबरोबर लवकरच 9 मुलांचा जन्म होणार आहे. म्हणजेच लवकरच ही व्यक्ती 138 मुलांचा जैविक पिता होणार आहे. ब्रिटनमध्ये राहणारे क्लाइव्ह जोन्स 66 वर्षांचे आहेत.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ज्या वयात लोक स्वतःला रिटायर्ड समजतात, त्या वयात त्यांनी स्पर्म डोनेशनचे काम सुरू केले. विशेष म्हणजे या कामासाठी ते कोणतेही पैसे घेत नाहीत. क्लाइव्ह गेल्या 10 वर्षांपासून शुक्राणू दान करत आहेत. 150 मुलांचा बाप होण्याची क्लाइव्हची आकांक्षा आहे. यानंतर तो या कामाला अलविदा करणार आहे.(Viral: हार्नियाचे उपचार करायला गेला व्यक्ती पण तपासात दिसले महिलांचे प्रायव्हेट पार्ट)

द सन वेबसाइटच्या बातमीनुसार, यूकेमध्ये स्पर्म डोनर बनण्यासाठी कमाल वय 45 वर्षे आहे. यामुळे क्लाइव्ह अधिकृत शुक्राणू दाता बनू शकला नाही. त्यामुळेच त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. फेसबुकच्या माध्यमातून तो आपल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतो. पैसे घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा क्लाईव्ह म्हणतो की, एखाद्याला आनंद दिल्याने त्याला खूप आनंद मिळतो. त्यामुळे तो एकही पैसा घेत नाही. क्लाइव्ह सांगतात की 10 वर्षांपूर्वी त्यांनी एका वर्तमानपत्रात एक लेख वाचला होता. त्यानंतर त्यांना ही कल्पना सुचली.