Viral: लग्नसमारंभ म्हटले की खुप खर्च आणि घरातल्या मंडळींची होणारी धावपळ हेच चित्र प्रत्येकाकडे दिसून येते. मात्र लग्नासाठी उपस्थितीत राहणाऱ्या मंडळींना मान देणे सुद्धा आवश्यक असते. यामुळे एकूणच लग्नाचा खर्च ही वाढला जातो. याच पार्श्वभूमीवर एका नवविवाहित दांपत्याने नुकसान भरपाईसाठी एक अनोखा मार्ग अवलंबल्याचा प्रकार समोर आला आहे. या कपलने लग्नात सहभागी झालेल्या मंडळींकडून चक्क चलान वसूल केले आहे.
लग्नसमारंभात खाण्याचा झालेला खर्च वसूल करण्यासाठी नववधूने एक विशेष चलान तयार केले. हे चलान तिने पाहुण्यांना पाठवत त्यांना 240 डॉलर (17,700 रुपये) भरण्यासाठी सांगितले. व्हायरल झालेले इनवॉइस हे ट्विटरवर हफिंगटन पोस्टचे वरिष्ठ फ्रंट पेज संपादक फिलिप लूईस नावाच्या एका युजरने शेअर केले आहे. त्याने यावर कमेंट करत म्हटले की, मी कधी असे पाहिले नाही की लग्नाच्या रिसेप्शनसाठी चलान फाडले गेले आहे.(Viral Video: नववधूसह वराने लग्नाच्या स्टेजवर केले Push Ups, व्हिडिओ तुफान व्हायरल)
Tweet:
I don’t think I’ve ever seen a wedding reception invoice before lol pic.twitter.com/ZAYfGITkxP
— philip lewis (@Phil_Lewis_) August 24, 2021
चलान मध्ये असे लिहिले आहे की, लग्नाचे रिसेप्शन नेग्रिल, जमॅका येथील एक रिसॉर्ट रॉयलटन नेग्रिल मध्ये झाले. पाठवण्यात आलेल्या बिलाचे कारण असे म्हटले की, 'नो कॉल, नो शो गेस्ट' तर लग्नाच्या रिसेप्शनसाठी 120 डॉलरचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच कोणतेही दोन पाहुणे आले नसल्यामुळे, एकूण किंमत $ 240 होती. चालान 18 ऑगस्टचे आहे. आणि लग्नाच्या पाहुण्यांना रक्कम भरण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे.
पावतीमध्ये एक चिठ्ठी देखील होती ज्यात असे लिहिले होते, "तुम्ही शेवटच्या हेडकाऊंट दरम्यान लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सीटची पुष्टी केल्यामुळे हे चलन तुम्हाला पाठवले जात आहे. वरील रक्कम तुमच्या वैयक्तिक सीटची किंमत आहे. तुम्ही आम्हाला फोन केला नाही किंवा तुम्ही उपस्थित राहणार नाही याची आम्हाला योग्य सूचना दिली नाही, तुमच्या आसन (जागा) साठी आगाऊ रक्कम भरण्यासाठी तुम्ही आम्हाला ही रक्कम दिली आहे. तुम्ही Zelle किंवा PayPal द्वारे पैसे देऊ शकता. त्याचसोबत पेमेंट करण्यासाठी कोणता मार्ग उत्तम आहे हे सुद्धा कळवा. धन्यवाद!