Viral Video: दिवाळीत घरे स्वच्छ करण्याची प्रथा आहे. प्रत्येकजण साफसफाई करताना खिडक्या आणि दरवाजे देखील स्वच्छ करतात. घर स्वच्छ असेल तरच लक्ष्मी येते असे मानले जाते. दरम्यान, दिवाळीपूर्वी स्वच्छतेचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला आपल्या बहुमजली फ्लॅटची खिडकी साफ करताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओवर लोकांकडून वेगवेगळ्या कमेंट्स केल्या जात आहेत. काही लोक असेही म्हणतात की, जर लक्ष्मीजी त्यांच्या घरी आली नाही तर ती कुठेच येणार नाही. ज्या ठिकाणी महिला उभी राहून साफसफाई करत आहे, तिथून तिचा पाय थोडा घसरला तर ती अनेक मजले खाली पडण्याची शक्यता आहे. यानंतरही ती पूर्ण तल्लीन होऊन आणि आरामात खिडक्या साफ करत आहे.
या व्हिडिओला जवळपास दहा लाख व्ह्यूज मिळाले आहेत. एवढ्या जोखमीच्या ठिकाणी उभ्या राहूनही ही महिला पूर्ण निष्काळजीपणाने कशी साफसफाई करत आहे, याबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकंदरीत दिवाळीपूर्वी या व्हिडिओची बरीच चर्चा होत असून लोकांमध्ये स्वच्छतेची क्रेझ पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ नवा नसला तरी या वर्षीच्या फेब्रुवारीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा -Little Boy Viral Video: वर्गात शिकवतानाचा लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल, त्याची उत्कटता पाहून नेटीझन्स म्हणाले हा तर 'Natural Leader')
Agar inke ghar Laxmi ji nahi aayi toh kisi ke ghar nahi aayegi Diwali pe pic.twitter.com/SPTtJhAEMO
— Sagar (@sagarcasm) October 20, 2022
गाझियाबादच्या इंदिरापुरम भागातील शिप्रा रिवेरा सोसायटीचा हा व्हिडिओ आहे. जिथे महिला पूर्ण निष्काळजीपणे घराच्या खिडक्या साफ करत होती. दरम्यान, समोरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका महिलेने व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केल्यावर तो व्हायरल झाला होता. व्हिडीओ बनवणाऱ्या महिलेने सांगितले की, तिने एवढा धोका पत्करून साफसफाई करू नये म्हणून आवाजही दिला. पण तिला कदाचित ऐकू आले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अशाप्रकारे स्वच्छता करणाऱ्या महिलेला सोसायटीच्या आरडब्ल्यूएने असा धोका पत्करून स्वच्छता न करण्याचा इशाराही दिला होता.