सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Videos) होतात. यातील बरेच व्हिडिओ लहान मुलांची निरागसता दाखवणारे असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Little Boy Viral Video) झाला आहे. जो एका शाळेतील वर्गात शिकणाऱ्या लहान मुलाचा आहे. अर्थात हा मुलगा शाळेत शिकत असला तरी तो वर्गातील सहकारी असलेल्या मुलांनाही शिकवतो आहे. त्याची निरागसता आणि प्रामाणिकपणा पाहून नेटीझन्स त्याच्या प्रेमात पडले आहेत. व्हिडिओ पाहिल्यावरआपल्यालाही या लहान मुलाचे कौतुक वाटू शकेल.
भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी अरुण बोथरा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्याया व्हिडिओमध्ये दिसते की, एक मुलगा संपूर्ण वर्गासमोर उभा आहे आणि त्याच्या वर्गमित्रांना शिकवण्यासाठी मोठ्याने ओरडत आहे. सगळा वर्ग या लहान मुलाच्या मागे ओरडत त्याची पुनरावृत्ती करताना दिसतो. वर्गातीलच काही पाढे आणि धड्यातील वाक्ये उच्चारताना त्याची उर्जा हा सर्वांच्या आवडीचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. (हेही वाचा, Viral Video: शालेय विद्यार्थी साप चावण्यापासून थोडक्यात बचावला; केरळमधील कोल्लममधील घटना, Watch)
बोथरा यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये हिंदीत लिहिले, "हे मूल मोठे झाल्यावर काय होईल याचा विचार करत आहे. उस्ताद किंवा फुटबॉल प्रशिक्षक, नेता? की टीव्ही अँकर?"
व्हिडिओ
ऐसे ही सोच रहा हूँ कि ये बच्चा बड़ा हो कर क्या बनेगा।
ड्रिल उस्ताद या फुटबाल कोच? नेता? या फिर टीवी एंकर 😅 pic.twitter.com/MA3MxhUBur
— Arun Bothra 🇮🇳 (@arunbothra) October 19, 2022
सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही क्लिप भारतातील ग्रामीण प्राथमिक शाळेत चित्रित करण्यात आल्याचे दिसते. मात्र, लहान मुलाचा उत्साह आणि अतुलनीय उर्जा यामुळे इंटरनेट युजरिस खळखळून हसल् आहेत. एक युजर्स लिहितो मला माझ्या आयुष्यात इतकी ऊर्जा हवी आहे. आणखी एकाने लिहिले आहे हा नैसर्गिक नेता आहे.