आपण अनेकदा पाहतो की, आपल्या आजूबाजूला सर्प आढळला की, ताबडतोब सर्प मित्रांना याची माहिती दिली जाते. तसेच केरळमध्येही अशीच घटना घडली. दरम्यान, केरळमधील (Kerala) एका वन निरीक्षक आपल्या जीवाची पर्वा न करता 40 विहिरीत पडलेला अजगराचे प्राण वाचवले आहे. अजगराला पाण्यातून काढत असताना वन निरीक्षक पुन्हा पाण्यात पडला. त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेले नागरिक पूर्णपणे घाबरले होते. धक्कादायक म्हणजे, ज्यावेळी निरीक्षक अजगराला बाहेर काढत होता. त्यावेळी अजगराने निरीक्षकाच्या सभोवती वेढा घातला होता. स्थानिक नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ काढला होता. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
शिगिल उर्फ श्रीकुट्टन असे अजगराला विहिरीतून काढणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. शिगील हा वन निरीक्षक म्हणून काम करत आहे. केरळमधील एका ग्रामस्थाला विहिरीत अजगर असल्याचे दिसले. तसेच तो अजगर विहिरीबाहेत येण्यास अयशस्वी ठरत असल्याचे दिसले. त्यानंतर काही ग्रामस्थांनी याची माहिती वन निरिक्षकांना दिली. त्यावेळी श्रीकुट्टन याने सापाला वाचवण्यासाठी विहिरीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी श्रीकुट्टन यांना अनेक संकटीचा सामना करावा लागला आहे. ज्यावेळी श्रीकुट्टन हे अजगराला वाचण्यासाठी पाण्यात उतरले तेव्हा त्यांना विहिरीबाहेर येण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांचा तोल गेला आणि ते पुन्हा पाण्यात पडले. त्यावेळी अजगराने त्यांना कुंपणदेखील घातले होते. त्यावेळी ग्रामस्थ पूर्णपणे घाबरले होते. परंत, श्रीकुट्टन यांनी न घाबरता अजगराला पाण्याबाहेर काढले. यामुळे त्यांचे देशभरातून कौतूक होत आहे. सध्या या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे. तसेच अनेकांनी या व्हिडिओला पसंती दाखवली आहे. हे देखील वाचा- दारुड्याने स्वतःच पोलिसांना फोन करून केली अटक करण्याची विनंती; कारण वाचाल तर वाटेल कौतुक (Watch Video)
पाहा व्हिडिओ-
सर्प मित्रांना प्रशासनाकडून प्रशिक्षण दिले जाते, तरीदेखील आपला जीव धोक्यात टाकून सापाचे प्राण वाचवतात. महत्वाचे म्हणजे, काही सर्प मित्रांना विषारी सापाचे बचाव करत असताना आपला जीव गमवावा लागला आहे. पंरतु, या धाडसी कामगिरीचे नेहमी कौतूक केले जातात.