दारुड्याने स्वतःच पोलिसांना फोन करून केली अटक करण्याची विनंती; कारण वाचाल तर वाटेल कौतुक (Watch Video)
Viral Video (Photo Credits: Facebook)

दारूचा नाद (Alcohol Addiction) एकदा का लागला की तो सोडवणं म्हणजे डोक्याला ताप होऊ शकतो. कित्येकदा तर ही नशा इतकी पक्की असते की स्वतः दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तीने प्रयत्न करूनही ही लत सुटत नाही. असाच काहीसा अनुभव एका व्यक्तीला आला असता त्याने आपल्या मदतीसाठी थेट पोलिसांनाच संपर्क केला आहे. या व्यक्तीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिया (Social Media) वर तुफान व्हायरल होत असून यामध्ये या व्यक्तीने स्वतः पोलिसांचा संपर्क क्रमांक (100) डायल करून यावर आपल्याला अटक करण्याची विनंती केली आहे. मी जर का 10 ते 12 दिवस तुरुंगात राहिलो तर तिथे मला दारू मिळणार नाही निदान या मार्गाने तरी माझी नशा सुटेल असा त्याने आपल्याला अटक व्हावी अशा इच्छेचे कारण सांगितले आहे.

फेसबुकवर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये हा व्यक्ती 'हॅलो..मला अटक करा मी दारुडा आहे', अशी अजब मागणी पोलिसांकडे करत असल्याचे दिसून येत आहे. (Mumbai Local मध्ये मद्यपान करणे पडले महागात; प्रवाशांनी दिला मनोसोक्त चोप (Video)

पहा हा व्हायरल व्हिडीओ

दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र, सोशल मीडियात या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे. या प्रामाणिक प्रयत्नावर अनेक नेटिझन्स कौतुकाचा वर्षाव करत आहेत, तर काहींनी या व्यक्तीला नशा मुक्ती केंद्रात जाण्याचा सल्ला दिला आहे.