Viral Video: तिच्या दोन्ही हातांवर ठेवले गुडघे, दाबून धरले तोंड; जमिनीवर लोळवून कोवडी टेस्ट
Viral Video | (Photo Credit: Twitter)

अवघे जग कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीतून सावरत असताना चीन मात्र पुन्हा एकदा या महारामारीच्या संकटात अडकला आहे. चिनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर कोविड-19 (COVID-19) संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सहाजिकच चीन सरकारचा आरोग्य विभाग नागरिकांची कोविड टेस्ट मोठ्या प्रमाणावर करत आहे. चीनमध्येही काही लोकांच्या मनात कोरोनाबद्दल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांबद्दलही भीती आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी नागरिकांना पकडून त्यांची कोरोना टेस्ट करत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओत आरोग्य कर्मचारी एका महिलेला खाली पाडून तिची कोरोना टेस्ट करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ चीनमधील शांघाय शहरातील आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की काही आरोग्य कर्मचारी एका महिलेला कोविड डेस्ट करण्यासाठी आग्रह करत आहेत. बहुदा ही माहिला घाबरली असावी किंवा तिला कोविड टेस्ट करायची नसावी. त्या याटेस्टला विरोध करत आहेत. त्यामुळे चिडलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिच्या नाकातील स्वॅब घेण्यासाठ तिला घट्ट पकडले (Covid Test Done Forcibly) आहे. तरीही ती महिला विरोध करत अल्याने एका कर्मचाऱ्याने चक्क तिला जमीनीवर पाडले. जमिनीवर लोळत असलेल्या महिलाच्या शरीरावत तो कर्मचारी बसला. त्याने तिचे दोन्ही हात आपल्या गुडघ्यांखाली घेतले आणि तिचा चेहरा घट्ट दाबून धरला. तिचे डोके घट्ट पकडल्याने तिला हालचाल करता येत नव्हती. हीच संधी साधत दुसऱ्या कर्मचाऱ्याने तिच्या नाकातून टेस्टसाठी आवश्यक असा स्वॅब घेतला. (हेही वाचा, Viral Video: नवरीने हळदी समारंभात केला जबरदस्त डान्स; सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय व्हिडिओ, Watch)

पुरुष कर्मचाऱ्याने घट्ट पकडून ठेवल्यामुळे महिलेला हालचालच करता येत नव्हती. परिणामी तिला तोंड उघडण्याशिवाय आणि निपचीत पडून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे. अनेकांनी या व्हिडिओखाली जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. आम्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही. केवळ वाचकांच्या माहितीस्तवर हा व्हिडिओ येथे देत आहोत.