फतेहगंज पूर्व परिसरात असलेल्या बिलपू-टिसुआ दरम्यन रेल्वे मार्गावर धावत असलेली जनता एक्सप्रेस ( Janata Express) अचानक गायब झाली. या प्रकारानंतर रेल्वे प्रशानात एकच खळबळ उडाली. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील बरेली (Bareilly) जवळ ही घटना बुधवारी (31 ऑगस्ट) रोजी घडली. प्राप्त माहितीनुसार जनता एक्सप्रेस (14265) नेहमीप्रमाणे आपल्या ठरल्या वेळेनुसार रुळावरुन धावत होती. दरम्यान, जनता एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुले ट्रेन जागेवरच थांबली. इतकेच नव्हे तर, गाडीतील जीपीएस सिस्टमही काम करत नव्हती. त्यामुळे गाडीचे लोकेशन ट्रॅक करणे रेल्वे प्रशासनाला शक्य होत नव्हते. त्यामुळे जीपीएसवरुन गायब झालेली रेल्वे आता शोधायची कशी या विचाराने मुलादाबाद रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. दरम्यान, लोको पायलटने काही खटपटी करुन इंजिनमधील बिघाड दुरुस्त केला आणि गाडी सुरु झाली.
प्राप्त माहितीनुसार, जनता एक्सप्रेस (14265) ही वाराणसी ते देहरादून असा प्रवास करत होती. रात्रीचे सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास गाडी बिलपूर रेल्वे स्टेशनवरुन निघाली. मात्र, टिसुआ स्टेशनला पोहोचण्याआधीच इंजिन खारब झाले आणि गाडी जागेवरच थांबली. मुरादाबाद कंट्रोलवर ट्रेन लोकेशन दिसत नसल्याने त्याची सूचना बरेली जंक्शनलाही देण्यात आली. त्यानंतर बरेलीहून आरपीएफ, जीआरपी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या शोधार्त पाठवले. (हेही वाचा, 'भारतीय रेल्वे'चं महिला प्रवाशांसाठी खास गिफ्ट; आता सुंदर पेंटिंग असलेल्या डब्यातून करा प्रवास (पहा व्हिडिओ))
आरपीएफ, जीआरपी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी पोहोचल्यावर समजले की, गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. लोको पायलटने इंजिनमधील बिघाड दूर केल्यानंतर गाडी सुरु झाली. जीपीएस काम करत नसल्यामुळे गाडीचे लोकेशन पाठवणे शक्य होत नव्हते. अखेर गाडी सापडल्याचे आणि ती पुन्हा सुरु झाल्याचे समजताच मुरादाबाद मंडल अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. गाडीचे इंजिन ठिक झाल्यावर रात्री दहा वाजता गाडी पुढील स्टेशनकडे रवाना झाली. जागरन डॉट कॉमने याबाबत वृत्त दिले आहे.