लखनौ: उत्तर प्रदेशातील प्रयागराज मधील एका लग्नसमारंभात एका हत्तीने एन्ट्री केली. मात्र एन्ट्री केल्यानंतर हत्तीने तेथे गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर हत्तीच्या या गोष्टीमुळे जीव वाचवण्यासाठी वधूवरांसह लग्नासाठी आलेल्या मंडळींची पळापळ झाल्याचे दिसून आले. हत्तीला शांत करण्यासाठी मेहूताने खुप प्रयत्न केले तरीही त्याने सर्व गोष्टी अस्थावस्थ करणे सुरुच ठेवले. ऐवढेच नाही तर लग्नाचा मंडपासह त्याने काही गाड्यांची सुद्धा तोडफोड केली. या व्यतिरिक्त गावातील काही घरांचे सुद्धा नुकसान केले.(घराबाहेर झोपलेल्या कुत्र्याची बिबट्याने 'अशी' केली शिकार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद Watch Video)
खरंतर अमलापुर मलगा गावात 11 जून रोजी एक वरात आली. तेव्हा वरातीसोबत लग्नासाठी द्वारपूजेसाठी एका हत्तीला सुद्धा बोलावले होते. लग्नसमारंभातील मंडळींसोबत हत्ती सुद्धा आल्याने पूजा करण्यापूर्वी फटाके फोडण्यात आले. फटाक्यांचा आवाज ऐकूण हत्ती सैरावैरा होत त्याने आजूबाजूला असलेल्या काही गोष्टी तोडण्यास सुरुवात केली.(Aquarium Manicure साठी नेल आर्टिस्ट ने वापरला जिवंत मासा; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल अचंबित)
येथे पहा व्हिडिओ-
प्रयागराज मधील नारायणपुर ठाणे थरवई येथे राहणारे आनंद त्रिपाठी यांचा मुलगा राजेश बाबू याच्या लग्नाची वरात धुमधडाक्यात अमलापुर मलवा गावात पोहचली. तेथे वरातीसह द्वार पूजेसाठी हत्तीसह घोडे सुद्धा आणण्यात आले होते. मात्र हत्तीने आपले रौद्र रुप धारण करत त्याने सर्वत्र नुकसान करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांना या बद्दल कळवण्यात आले. गावातील नागरिकांच्या मदतीने रात्री उशिरा त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यात आले.