Buffalo Solved Theft Case: म्हशीमुळे झाला चोरीचा उलघडा; पोलीसांनी लढवली शक्कल, सुटला तिडा
Buffalo Solved Theft Case | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

उत्तर प्रदेशमध्ये चक्क एका म्हशीने चोरी प्रकरणाचा (Buffalo Solved Theft Case) उलघडा केला आहे. होय, पोलिसांनाही या प्रकरणाचा उलघडा करता आला नव्हता. अखेर एक म्हैसच पोलिसांच्या कामी आली. जिने या चोरीनाट्याचा उलघडा केला. उत्तर प्रदेश राज्यातील कन्नौज (Kannauj) जिल्ह्यात असलेल्या जलेसर (Jalesar) शहरातील अली नगर परिसरातील ही घटना आहे. या परिसरातील विरोंद्र नामक व्यक्तीने पोलिसांत तक्रार दिली होती की त्याचा मित्र धर्मेंद्र याने त्याची म्हैस चोरली आहे आणि कोणाला तरी विकली आहे. धर्मेंद्र याने विरेंद्रच्या आरोपाचे खंडण करत आपण म्हैस चोरली नसल्याचे म्हटले होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी (Uttar Pradesh Police) नामी शक्कल लढवत या प्रकरणाचा तपास केला.

दरम्यान, धर्मेंद्र याने म्हैस खरोखरच चोरली आहे किंवा नाही. तसेच, विरेंद्र याची म्हैस खरोखरच चोरी झाली आहे किंवा नाही याबाबत पोलिसांमध्येही संभ्रम होता. यावर पोलिसांनी एक नामी शक्कल काढली. पोलिसांनी तक्रारदार आणि आरोपी यांना एकमेकांसोबत उभे केले. चोरी झालेली म्हैस त्यांच्यासमोर काही अंतरावर उभी केली. त्यानंतर दोघांनाही म्हैशीला त्यांना बोलावण्यास सांगितले. विशेष म्हणजे म्हशीने आपल्या मालकाचा आवाज ऐकताच ती धर्मेंद्र याच्याकडे धावत गेली. पोलिसांनी धर्मेंद्र याचाच म्हैशीवर मालकी हक्क असल्याचे सांगत त्याची म्हैस त्याला परत केली.

दरम्यान, वरिष्ठ उप निरीक्षक विजयकांत मिश्रा यांनी सांगितले की, 'आम्ही म्हैशीला आपल्या पसंतीचा आवाज आणि मालक ओळखण्याची संधी देण्याचा प्रयत्न केला. जेव्हा वीरेंद्र आणि धर्मेंद्र यांनी म्हशीला बोलावले तेव्हा ती धर्मेंद्र याच्याकडे धावून गेली. यामुळे म्हशीच्या मालकी हक्काचा फैसला झाला.' (हेही वाचा, Labrador Picks Up Sex Toy: 'सेक्स टॉय' तोंडात पकडून पळाला कुत्रा; तिची झाली दैना.. दैना)

दरम्यान, विरेंद्र याने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, त्याचा मित्र धर्मेंद्र याने आपली म्हैस चोरुन विकली होती. ही म्हैस त्याने रसुलाबाद गावातील एका व्यक्तीला विकली होती. हा व्यक्ती जेव्हा पुढे बाजारात आपली म्हैस विकण्यासाठी घेऊन गेला तेव्हा विरेंद्र याने आपली म्हैस बोरोबर ओळखली. विरेंद्र याने त्या माणसासोबत म्हैशीच्या मालकी हक्कावरुन वादविवाद सुरु केला तेव्हा हे प्रकरण पोलिसांत गेले. पोलिसांनी केलेल्या तपासात धर्मेंद्र याने विरेंद्र याची म्हैस 19,000 रुपयांच्या बदल्यात संबंधित व्यक्तीला विकल्याचे पुढे आले.