एकाच मंडपात पार पडले आई आणि मुलीचे लग्न; UP च्या गोरखपूर जिल्ह्यातील अनोखा विवाहसोहळा चर्चेत
Representational Image (Photo Credit: Wikimedia Commons)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोरखपूर (Gorakhpur) जिल्ह्यातील एक अनोखा विवाहसोहळा  (Unique Wedding) सध्या प्रचंड चर्चेत आहेत. एकाच मंडपात आई आणि मुलीने लग्न केले. दोघींनीही एकाच दिवशी नव्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी मुलीसह आईला देखील नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अशाप्रकारचा विवाह कधीच अनुभवला नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत हा विवाहसोहळा  (Wedding Ceremony) आयोजित करण्यात आला होता. त्यात आई आणि मुलीचे लग्न आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरला.

गोरखपूर जिल्ह्यातील पिपरौली ब्लॉक परिसरात राहणाऱ्या बेइली नावाच्या महिलेच्या पती निधन झाले होते. त्यामुळे त्यांनी दिरासोबत पुर्नविवाह केला. मुलीच्या लग्नादिवशीच त्यांनीही दिर जगदीश सोबत विवाहगाठ बांधली. मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत विवाहसोहळ्यासाठी बेइली ने मुलगी इंदू सोबत स्वत:चे नाव देखील रजिस्ट्रर केले आणि एकाच दिवशी दोघी विवाहबद्ध झाल्या. आई बेइलीने दिर जगदीशसोबत लग्न केले तर मुलगी इंदू हिने पाली येथे राहणाऱ्या राहुल सोबत विवाहगाठ बांधली. (केरळमधील शासकीय वृद्धाश्रमातील 60 वर्षीय वृद्ध जोडप्याने केला विवाह!)

सामुहिक विवाहसोहळ्यात आई-मुलीने आपल्या पार्टनरसोबत सात फेरे घेतले. असा विवाहसोहळा पहिल्यांदाच अनुभवणारे पाहुणे थक्क झाले आहेत. दरम्यान, गुरुवारी पिपरोली ब्लॉक मुख्यालयात 63 जोड्या विवाहबंधनात अडकल्या. त्यात एकाच दिवशी नवे दांपत्य जीवन सुरु करणाऱ्या मायलेकी चर्चेचा विषय ठरल्या. (उत्तराखंड: 4 किलोमीटर बर्फातून चालत नवरदेव पोहोचला लग्नमंडपात; पहा व्हायरल फोटो)

दरम्यान, सध्याच्या काळात अनेक समलैगिंक विवाह, वृद्ध जोडप्यांचे पुर्नविवाह, वयात मोठे अंतर असूनही पार पडणाऱ्या लग्नांबद्दल तुम्ही ऐकले किंवा वाचले असेल. अशा या आगळ्यावेगळ्या लग्नांच्या मालिकेत आता अजून एका वेगळ्या विवाह सोहळ्याचा समावेश झाला आहे.