
काटकसरीचं जीवन जगणारे अनेक जण त्यांच्या बॅंक खात्यामध्ये पै अन पै चा हिशोब ठेवत असतात. त्यामुळे कोणते पैसे कुठे कहर्च खर्च होत आहेत याचा त्यांना अंदाज असतो पण अचानक तुम्हांला खात्यामध्ये काहीही मेहनत न करता कोट्यावधी रूपये असल्याचं समजलं तर? काहींना आनंद होईल पण जरा स्थिर स्थावर झाल्यानंतर त्याचा झटका देखील लागू शकतो. दरम्यान उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) बालिया (Balia) मध्ये एका किशोरवयीन मुलीसोबत असाच प्रकार घडला आहे. वडील मजूर काम करणार्या किशोरवयीन मुलीच्या अकाऊंट मध्ये 10 कोटीच्या आसपास रक्कम असल्याने तिचं अकाऊंट फ्रीझ करण्यात आलं आहे. त्या मुलीला हा प्रकार समजल्यानंतर तिने पोलिसांत धाव घेतली आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, बालिया गावातील 16 वर्षीय मुलीच्या बॅंकेमध्ये 9 कोटी 99 लाख रूपये जमा होते. 2018 मध्ये तिने बॅंक अकाऊंट सुरू केले. त्यानंतर या काळात तिच्या अकाऊंटद्वारा सुमारे 17 लाखांचा व्यवहार झाला आहे. बलिया मध्ये बांसडीह मधील रुकनपुरा गावामध्ये सरोज ही मुलगी राहते. तिने इलाहाबाद बॅंक च्या बांसडीह शाखेमध्ये दोन वर्षांपूर्वी खातं उघडलं होतं. जेव्हा तिने खात्यामध्ये किती रक्कम जमा आहे हे पाहण्यासाठी विचारणा केली तेव्हा संबंधित अधिकार्यांनी ब्रांच मध्ये जाण्याचा सल्ला दिला कारण तिच्या खात्यात 10 कोटीच्या आसपास रक्कम जमा असल्याने अकाऊंट होल्ड करण्यात आलं होतं. बॅंक मॅनेजरनेही तिला उडवा उडवीची उत्तरं देत पोलिस ठाण्यात पाठवण्याची भाषा केली.
बॅंकेमध्ये झालेल्या या व्यवहाराबद्दल सरोजने पोलिस तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिसांकडून इतकी मोठी रक्कम बॅंक अकाउंट मध्ये कशी आली याचा तपास सुरू आहे. नवभारत टाईम्सच्या माहितीनुसार, दोन वर्षात या मुलीच्या अकाऊंटमधून 17 लाखापेक्षा अधिकचा व्यवहार झाला आहे. 10 कोटी अकाऊंट मध्ये नाही. सध्या मोठ्या रक्कमेचे आर्थिक व्यवहार होत असल्याने 10 कोटीचा कॅप लावण्यात आला आहे. तिच्या अकाऊंटमधून काढलेले सारे पैसे एटीएमच्या माध्यमातून काढले गेले आहेत.
दरम्यान पोलिसांना देण्यात आलेल्या जबाबामध्ये सरोजने काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीने फोन कॉलवर आधार सोबतच काही कागदपत्र पोस्ट करायला सांगितली होती. त्याच्या बदल्यात प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये लाभ मिळवून देईल असं सांगितलं होतं. त्यानंतर एटीएम कार्ड त्याचा पिन नंबर देखील तिने दिला होता. सश्या सरोजच्या जबाबानुसार पोलिस पुढील तपास करत आहेत.