आईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)
Mothers Womb Ultrasound Photo (Photo Credits: YouTube)

भावंडांचे नाते हे तुझे-माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना, असे असते. भांडणं, रुसवे-फुगवे हे अगदी नेहमीचेच आणि लहानपणापासूनचे. पण आईच्या पोटात कधी जुळ्या भावंडांना भांडताना पाहिले आहे का? नाही मग हा व्हिडिओ पहा. सोशल मीडियावर सध्या एक अल्ट्रासाऊंट व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत जुळी अर्भके एकमेकांशी भांडताना, मस्ती करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ चीन मधील Yinchuan शहरातील असून सध्या सोशल मीडियात याची चांगलीच चर्चा आहे.

प्रेग्नेंट महिला आपल्या पतीसह अल्ट्रासाऊंट स्कॅनिंगसाठी गेली असताना पोटात जुळी अर्भके भांडताना दिसली. ते पाहुन डॉक्टर देखील चकीत झाले. स्कॅनिंग पाहुन अचंबित झालेल्या प्रेग्नेंट महिलेच्या पतीने याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर तो भयंकर व्हायरल झाला.

तुम्हीही पहा हा व्हिडिओ:

 

व्हिडिओत ही दोन अर्भके एकमेकांशी हातापायाने मस्ती करताना दिसत आहेत.