UGC NET Exams 2020 मध्ये चूकीच्या उत्तरांसाठी  Negative Marking? पहा PIB Fact Check ने केलेला या फेक न्यूज वरील खुलासा !
Fake News on Social Media (Photo Credits: File Image)

सोशल मीडियामध्ये खोट्या बातम्या झपाट्याने पसरवल्या जातात. दरम्यान आधीच कोरोना व्हायरसच्या संकटामुळे यंदाच्या शैक्षणिक वरर्षाचे तीन - तेरा वाजले असताना आता नॅशनल टेस्टिंग एजंसी कडून घेतल्या जाणार्‍या यंदाच्या UGC NET Exams 2020 मध्ये चूकीच्या उत्तरांसाठी Negative Marking नुसार निकाल लावला जाईल असे वृत्त आहे. दरम्यान हे एका वृत्तपत्राच्या बातमीचा आधार देत पसरवले जात आहे. मात्र केंद्रीय संस्थ्या PIB कडून हे वृत्त खोटं असून ते फेटाळण्यात आले आहे. पीआयबीने त्यावर खुलासा देखील प्रसिद्ध केला आहे.

यंदा 19 सप्टेंबरला UGC NET Exams 2020 च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 24 सप्टेंबर पासून 5 ऑक्टोबर पर्यंत परीक्षा होतील असे सांगण्यात आले आहे. दरम्यान या 12 दिवसात सकाळी 9-12 आणि दुपारी 3-6 या वेळेत परीक्षा होणार आहेत.परंतू यामध्ये चूकीच्या प्रश्नाला Negative Marking असेल. असे वृत्त देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. परंतू हे वृत्त चूकीचे असल्याचं सांगण्यात आले आहे.

इथे पहा ट्वीट

सध्या कोरोना व्हायरसच्या काळात नागरिकांच्या मनातील भीतीचा गैरफायदा घेत अनेकजण खोटी वृत्त सोशल मीडियामध्ये व्हायरल करत आहेत. दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, ट्वीटरच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवल्या जातात. मात्र कोणत्याही वृत्तावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. संबंधित यंत्रणा, सरकारी विभागाकडून देण्यात येणार्‍या माहितीवर विश्वास ठेवा.