Uber ड्रायव्हरचा प्रामाणिकपणा! मध्यरात्री परत केली प्रवाशाची MacBook आणि Cash असलेली बॅग
Uber Logo & Abhijit Majumder (Photo Credits: Twitter)

तुमचे कधी कुठले सामान बस, ट्रेन किंवा रिक्षा-टॅक्सीत राहिले आहे का?  आणि ते तुम्हाला कधी परत मिळाले आहे का? परंतु, कोलकाता येथे एका भाग्यवान व्यक्तीला आपली लॅपटॉपची बॅग आणि त्यासोबत असलेली कॅश एका उबर ड्रायव्हरने (Uber Driver) मध्यरात्री परत आणून दिली. ही व्यक्ती कोलकाता विमानतळावरुन (Kolkata Airport) आपल्या घरी परतत होता. त्यावेळी तो मॅकबुक (MacBook) लॅपटॉप असलेली बॅग आणि काही कॅश (Cash) गाडीत विसरला. परंतु, प्रामाणिक उबर ड्रायव्हरने मध्यरात्री परत येऊन व्यक्तीला त्याची बॅग परत केली.

नेहमीच कॅब ड्रायव्हर विरुद्ध नकारात्मक पोस्ट सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच पाहला मिळते. मला जाणवले की, मी माझी बॅक कोलकाता विमानतळावरुन परतत असताना कारमध्ये विसरलो. यामध्ये माझा मॅकबुक, काही पैसे, चाव्या आणि पुस्तकं होती. श्रवणकुमार नामक या तरुण उबर ड्रायव्हरला मी कॉल केला. मध्यरात्रीनंतर तो पुन्हा परत आला आणि माझी बॅग जशीच्या तशी माझ्याकडे सुपूर्त केली, अशी माहिती अभिजित मुजुमदार याने आपल्या ट्विटरद्वारे दिली.

पहा ट्विट: 

(Uber Cab चालक मुंबई-पुणे एक्सप्रेस वर गाडी चालताना डुलक्या काढत असल्याने प्रवासी तरूणीला चालवावी लागली गाडी, Watch Video)

त्यानंतर या व्यक्तीने ड्रायव्हरचे आभार मानत ही पोस्ट शेअर केली आणि त्यामध्ये उबरला सुद्धा टॅग केले. प्रत्येकवेळी उबर ड्रायव्हर संबंधित चांगल्या पोस्ट आपल्याला दिसून येत नाहीत. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये मास्क न घातलेल्या तीन महिलांना नेण्यास नकार दिल्यामुळे त्या महिला उबर ड्रायव्हरच्या तोंडावर थुंकत होत्या. या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी त्या महिलांनावर जोरदार टीका केली.