Fake news of PM Modi greeting Gautam Adani's wife (Photo Credits: Twitter)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा सध्या दोन महिलांसमोर हात जोडून अभिवादन करत असल्याचा फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहे. दरम्यान या फोटोमधील महिला प्रीती अदानी (Priti Adani) असल्याचा दावा केला जात आहे. अदानी ग्रुपचे मालक गौतम अदानी यांची ती पत्नी आहे. दरम्यान मोदी सरकार हे या उद्योगपतींच्या हातामधील सरकार असल्याचा आरोप करत सोशल मीडीयामध्ये काही फोटो हे अदानी कुटुंबासोबतचे असल्याचा दावा काही अकाऊंट्स कडून केला जात आहे.

एका वायरल फोटोमध्ये लाल आणि गोल्डन साडीमधील महिलासमोर मोदी हात जोडतानाचा फोटो शेअर करत त्यामध्ये असं लिहण्यात आलं आहे की,' पहा 56 इंचाची छाती असणारा माणूस, 36 इंच छातीच्या महिलेसमोर हात जोडून आहे. स्वतःच्या बायकोला घराबाहेर काढून अदानीच्या बायकोसमोर झुकतो. दरम्यान ही फोटोमधील महिला प्रीती अदानी नसून दीपिका मंडोल आहेत. दीपिका या Divyajyoti Cultural Organisation and Social Welfare Society या एनजीओच्या चीफ फंक्शनरी ऑफिसर आहेत. दरम्यान क्विंट सोबत बोलताना समर मंडोल यांनी फोटोमधील महिला त्यांची पत्नी दीपिका मंडोल असल्याचं म्हटलं आहे. त्या प्रीती अदानी असल्याचा खोटा दावा केला जात आहे.

ट्वीट

दुसर्‍या एका फोटोमध्ये देखील मोदी एका महिलेसमोर हात जोडलेले पाहून तो फोटो देखील अदानीच्या पत्नीचा असल्याचा दावा काही नेटकर्‍यांनी केला आहे. मात्र तोदेखील खोटा आहे. त्या प्रीती अदानी नसून माजी Tumkur mayor Geetha Rudresh आहे. हा फोटो 2014 सालचा Tumkur दौर्‍याचा आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी इंडियन फूड पार्कचं उद्घाटन करण्यासाठी गेले होते. Fake News of PM Narendra Modi: मुकेश अंबानी यांच्या नातवाला भेटायला हॉस्पीटलमध्ये गेले पंतप्रधान नरेंद्र मोदी? पाहा व्हायरल फोटोमागील नेमके सत्य अर्थात Fact-Check.

ट्वीट

दरम्यान त्यांच्या ऑफिशिएल वेबसाईटवर याबद्दलचा संपूर्ण रिपोर्ट आहे. तर वायरल फोटोमधील कपड्यांमध्येच नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे अदानींच्या पत्नी समोर झुकलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी असे चित्र उभारत काही फोटो वायरल केले जात आहेत.