पारदर्शक PPE कीटच्या आतमध्ये फक्त अंतर्वस्त्रे घालून नर्सने केले कोरोना व्हायरस वॉर्डमध्ये उपचार; रुग्ण म्हणतात ‘आम्हाला काहीच समस्या नाही’
Nurse wears see-through PPE gown, Pics Go Viral (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटकाळात रुग्णांवर उपचार सुरु आहेत, सरकार उपाययोजना राबवत आहे, या विषाणूविरुद्ध अनेकजण लढत आहेत. या दरम्यान कधी कधी अशा काही घटना घडतात, ज्यामुळे आपल्याला हसावे की रडावे हेच समजत नाही. आताही रशिया (Russia) मध्ये अशीच एक घटन घडली आहे, जिथे पारदर्शक पीपीई (Transparent PPE) कीटच्या आतमध्ये फक्त अंतर्वस्त्रे (Lingerie) घालून एका नर्सने रुग्णांवर उपचार केले आहेत. मॉस्कोपासून 100 मैलांवर टूला येथील रीजनल क्लिनिकल हॉस्पिटलमधील एका रुग्णाने या नर्सचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ही नर्स फक्त अंतर्वस्त्रांमध्ये दिसत आहे.

नर्सने याबाबत स्पष्टीकरण देताना रुग्णालय प्रशासनाला सांगितले की, तिने परिधान केलेले पीपीई किट हे खूपच जास्त पारदर्शी आहे हे आपल्या लक्षात आले नाही. रुग्णालयाच्या प्रशासनाने यापूर्वी तपासणी दरम्यान, पीपीई किट अंतर्गत या नर्सने अंतर्वस्त्रे परिधान केल्याचे मान्य केले होते. मात्र, नंतर त्यांनी दावा केला की तो स्विमिंग सूट होता. पीपीई कीटमध्ये प्रचंड उकडत असल्याने आपण फक्त अंडरगारमेंट्स परिधान केले असल्याचे या नर्सने सांगितले आहे. (हेही वाचा: सिंगापूर मध्ये सापडला अंडरवेअर चोर; लॉकडाऊन मोडत महिलेच्या Lingerie चोरताना पोलिसांनी केली अटक, वाचा सविस्तर)

प्रादेशिक आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या संसर्गजन्य रोग विभागाच्या नर्सवर कपड्यांबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई केली गेली आहे. या नर्सने झालेल्या प्रकरणाबद्दल जाहीरपणे काहीच वक्तव्य केले नाही, तसेच तिच्यावर कोणती कारवाई झाली याबाबतही माहिती दिली नाही. वॉर्डमधील रुग्णांनी मात्र नर्सच्या या कपड्यांबद्दल आम्हाला कोणतीही समस्या नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान. रशियामध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या संसर्गाची 317,554 प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि 3,099 लोकांचा मृत्यू झाला आहे. मॉस्कोच्या कोरोना व्हायरस मृत्यूची संख्या एप्रिलच्या तुलनेत मेमध्ये 'लक्षणीय'रित्या वाढली आहे.