Jhansi Fortuner Accident: हृदयद्रावक घटना! टोयोटा फॉर्च्युनरने 70 वर्षीय वृद्धाला चिरडले, पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ
Fortuner Crushes Elderly video (PC - X/@haidarpur)

Jhansi Fortuner Accident: उत्तर प्रदेशातील झाशी (Jhansi) येथे एका अरुंद रस्त्यावर टोयोटा फॉर्च्युनरने वाहनाच्या मागे उभे असलेल्या 70 वर्षीय वृद्धाला चिरडल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही घटना झाशीच्या सिपरी बाजार परिसरात घडली. यावेळी अरुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या उभ्या होत्या, त्या दरम्यान चालक गाडी मागे घेत असताना एक वृद्ध व्यक्ती गाडीखाली आली.

सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या चार मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, उत्तर प्रदेश-नोंदणीकृत पांढरी टोयोटा फॉर्च्युनर एका अरुंद गल्लीत रिव्हर्स होताना दिसत आहे. काही सेकंदांनंतर राजेंद्र गुप्ता नावाचा एक व्यक्ती एसयूव्हीच्या चिरडताना दिसत आहे. कारखाली एक व्यक्ती असल्याचं न समजल्याने ड्रायव्हर काही मीटर अंतरावर कार मागे घेतो. गाडीने खेचल्याने तो माणूस वेदनेने ओरडत होता. लोकांचा आरडाओरडा ऐकून ते गाडीच्या दिशेने धावले आणि चालकाने गाडी पुढे सरकवली. त्यानंतर, रक्तबंबाळ झालेला व्यक्ती रस्त्यावर पडली. (हेही वाचा -Uttar Pradesh Accident Video: दुचाकीस्वाराने 70 मीटर नेलं फरफटत, अपघातात 4 वर्षाचा मुलीचा मृत्यू, वाराणसी येथील थरकाप उडवणारी घटना (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

रस्त्यावर गर्दी झाल्याने फॉर्च्युनरचा चालक गाडीतून खाली उतरला. त्याने त्या व्यक्तीला गाडीखालून काढले. या घटनेत वृद्धाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर वृद्धाला रुग्णालयात नेले. वृद्ध व्यक्तीच्या मुलाच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी बेदरकारपणे वाहन चालवणे, एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात आणणे आणि गंभीर दुखापत केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.