Uttar Pradesh Accident Video: उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एका दुचाकीनेस्वाराने 4 वर्षाच्या मुलीचा अपघात केला. या अपघातात दुर्दैवाने मुलीचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीच्या धडकेत मुलीचा अपघात झाला. अपघातावेळी तीचे वडिल सोबत होते. हेही वाचा- पुणे पोर्श कार अपघातातील आरोपीने Rap Song बनवल्याचा दावा खोटा, व्हिडिओ Cringistaan नावाच्या एका instagram influencer ची असल्याची माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, काव्या करण गुप्ता असं मृत मुलीचे नाव आहे. ती रस्त्याच्या कडेला वडिलांसोबत बसची वाट पाहत होती. अचानक ती रस्त्याच्या दिशेने काही पावले चालत पुढे आली आणि तिला भरधाव दुचाकीने दुचाकीने धडक दिली. या धडकेत दुचाकीने मुलीला काही अंतरापर्यंत ओढत पुढे नेले. 70 मीटर मुलीला दुचाकीने फरफटत नेल्याचे व्हिडिओत दिसत आहे. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
वाराणसी
तेज रफ्तार बाइक चालक ने बच्ची को मारी टक्कर
इलाज के दौरान हुई बच्ची की मौत
हादसा पास के सीसीटीवी में हुआ कैद
आरोपी बाइक चालक को तलाशने में जुटी पुलिस pic.twitter.com/6b8yeeGdTZ
— Gaurav shukla (@Gauravs34086132) May 23, 2024
काव्या वडिलांसोबत २० मेच्या सायंकाळी ७ वाजता बाहेर जात होती. तीचे वडिल उत्तर प्रदेश पोलिस विभागात कॉन्स्टेबल आहेत. दोघे जण पांडेपूरला चौबेपूर येथे बसची वाट पाहत होते त्यावेळीस ही घटना घडली. मुलीची आई आणि बहिण रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला उभे होते. मुलीने वडिलांचा हात कधी सोडला हे त्यांना कळलेच नाही. जेव्हा अपघात झाला त्यानंतर मुलीच्या आईने आणि भावाने मुलीच्या मागे धाव घेतला तेव्हा वडिलांच्या लक्षात आले की, मुलीचा अपघात झाला.
पालकांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार करण्याआधीच डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. या प्रकरणी वडिलांनी अपघाताची तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल करताच पोलिसांकडून दुचाकीस्वाराचा शोध सुरु आहे.