MP Mimi Chakraborty Tik Tok Video: तृणमूल काँग्रेस खासदार नुसरत जहां, मीमी चक्रवर्ती टीक टॉक व्हिडिओ व्हायरल; पाहा इथे
TMC MPs Mimi Chakraborty, Nusrat Jahan | (Photo Credit: Twitter)

MP Nusrat Jahan and Mimi Chakraborty Tik Tok Video: चित्रपटसृष्टीतून राजकारणात पाऊल टाकलेल्या खासदार मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty) आणि नुसरत जहां (Nusrat Jahan) सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. मीमी आणि नुसरत या दोघीही तृणमूल कांग्रेस (Trinamool Congress) च्या नवनिर्वाचित लोकसभा सदस्य म्हणजेच खासदार आहेत. दोघींचा एक व्हिडिओ आणि काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात दोघीही पाश्चात्य पोशाखामध्ये दिसतात. दोघींचे फोटो व्हिडिओ आणि त्यात त्यांची वेशभुषा पाहून नेटकऱ्यांनी त्यांना सोशल मीडियावरुन ट्रोल करणे सुरु केले आहे.

दरम्यान, मीमी आणि नुसरत या सोशल मीडियावर जरी ट्रोल झाल्या असल्या आणि अनेकांनी त्यांच्यावर टीकेचा येथेच्छ पाऊस पाडला असला तरी त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. काही युजर्सनी या दोघींना ही संसद आहे. स्टुडीओ नाही, अशी सल्ला वजा समज दिली आहे. तर आणखी एका युजर्सने असे वर्तन आपल्या पदासाठी योग्य नसल्याचे म्हटले आहे. तर, काहींनी म्हटले आहे की, भारताला पुढच्या पीढितील नेतृत्व मिळाले आहे. दरम्यान, बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी नुसरत आणि मीमी यांचा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. (हेही वाचा, गुजरात: नरेंद्र मोदी यांच्या विजयाचे गोड सेलिब्रेशन,आईस्क्रीम विक्रेत्याने साकारली मोदींच्या चेहऱ्याची सीताफळ कुल्फी (Watch Video))

राम गोपाल वर्मा टीक टॉक व्हिडिओ ट्विट

मीमी चक्रवर्ती आणि नुसरत जहां या दोघीही पाश्चात्य पोषाखातच संसदेत सोमवारी पोहोचल्या. दोघींनीही संसदेत प्रवेश करण्यापूर्वी संसदेच्या फाटकाबाहेर ओळखपत्र दाखवून छायाचित्रंही काढली आणि ती सोशल मीडियावर पोस्टही केली. सोशल मीडियावर मीमी आणइ नुसरत यांचे फोटो झळकताच अनेकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. दरम्यान, आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना नुसरत यांचे मॅनेरज रुद्रदीप यांनी सांगितले की, त्या (नुसरत) अशा प्रकारच्या टीकेला फारसे महत्त्व देत नाहीत.

मीमी चक्रवर्ती ट्विट

नुसरत जहां ट्विट

दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत तृणमूल कांग्रेस (Trinamool Congress) पक्षाच्या वतीने संसदेत प्रवेस करत मीमी आणि नुसरत यो दोघींनीही आपल्या करीअरचा दुसरा टप्पा सुरु केला आहे. मीमी चक्रवर्ती या तृणमूल काँग्रेस पक्षाकडून पश्चिम बंगाल येथील यादवपुर लोकसभा मतदारसंघातून तर, नुसरत जहाँ बशीर हाट लोकसभा मतदारसंघातून लोकसभा सदस्य म्हणून निवडमूक आल्या आहेत.