भारताचा तिरंगा (Tiranga) हा भारताची शान आहे. आझादी का अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) अंतर्गत भारत सरकार कडून 'हर घर तिरंगा' मोहीम (Har Ghar Tiranga Movement) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतात घरा घरामध्ये तिरंगा लावण्याचं आवाहन करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना काही दिवसांपूर्वी झालेल्या 'मन की बात' कार्यक्रमामध्ये सोशल मीडीयातही लोकांनी आपली प्रोफाईल पिक्चर 'तिरंगा' करण्याचं आवाहन केले आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या डीपी वर तिरंगा ठेवला आहे.
शौर्य, त्याग आणि सुजलाम भारताचं प्रतिक म्हणजे भारताचा तिरंगा आहे. मग मानाने डोलणर्या या तिरंग्याला तुमच्या डीपी वर ठेवण्यासाठी लेटेस्टली कडून तिरंग्याचे काही फोटोज शेअर करण्यात आले आहेत. ते फोटोज तुम्ही डाऊनलोड करून तुम्ही देखील डीपी तिरंगा करू शकता.
तिरंग्याचे काही फोटोज
हर घर तिरंगा उपक्रम
भारतीय तिरंगा हा Pingali Venkayya या आंध्रप्रदेशातील एका स्वातंत्र्य सेनानी डिझाईन केला आहे. 22 जुलै 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात त्याला स्वीकरण्यात आले होते.