Digital Har Ghar Tiranga मोहिमेला आजपासून सुरुवात, पंतप्रधान मोदींसह अमित शाहांनी बदलला सोशल मिडीया प्रोफाइल पिंक्चर
Pm Narendra Modi (Photo Credit - Twitter)

देशाच्या अमृत महोत्सवा निमित्त 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान तुम्ही डिजीटल (Digital) माध्यमातून देखील साजरी करु शकता. 31 जुलै रोजी प्रसारीत झालेल्या मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमात खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) या संबंधी माहिती दिली होती. 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान स्वतच्या सोशल मिडीया प्लॉटफॉर्मचा (Social Media Platform) प्रोफाईल पिक्चर (Profile Picture) बदलून या 13 दिवसाच्या कालवधीत तिरंगा प्रोफाईल पिक्चर म्हणून ठेवण्याचं आवहान पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान  मोदींच्या आवाहनाप्रमाणे मोदींनी आज खुद्द त्यांच्या सोशल मिडियाचा प्रोफाईल पिक्चर बदलून तिरंगा ठेवण्यात आला आहे. तसेच  देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील स्वत:च्या प्रोफाईल पिक्चरवर तिरंगा ठेवला आहे.

 

15 ऑगस्ट 2022 ला भारत स्वातंत्र्य होवून 75 वर्ष पूर्ण होतील. म्हणून यावर्षीचा स्वातंत्र्यदिवस (Independence Day) भारतासाठी (India) खास आहे. हे संपूर्ण वर्ष आपण स्वातंत्र्याचा मृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mohotsav) म्हणून साजरा करत आहोत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत नागरिकांनी कार्यालयासह घरोघरी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत करणे हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mohotsav) कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पण तुम्ही तुमच्या सोशल मिडीयाचा प्रोफाइल पिक्चर तिरंगा ठेवत देखील डिजीटली या अनोख्या मोहिमेत सहभागी होवू शकता. ( हे ही वाचा:- Har Ghar Tiranga: Social Media च्या Profile Picture वर तिरंगा ठेवण्याचं पंतप्रधान मोदींच आवाहन, Whats App, Facebook, Instagram सह Twitter चा 'असा' बदला प्रोफाईल पिक्चर)

 

तरी  तुम्ही तुमच्या सोशल मिडीया म्हणजेच फेसबूक (Facebook), व्हॉट्स अॅप (Whats App),इंस्टाग्रामचे (Instagram), ट्वीटरचा (Twitter) तुमचा  प्रोफाईल पिक्चर बदलून पुढील १३ दिवसांसाठी म्हणजे २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर तिरंगा ठेवू शकता. देशाच्या पंतप्रधानासह गृहमंत्र्यांनी या मोहिमेत सहभागी होत देशाच्या नागरिकांना विशेष आवाहन केले आहेत.