यावर्षीचा स्वातंत्र्यदिवस (Independence Day) भारतासाठी (India) खास आहे. कारण 15 ऑगस्ट 2022 ला भारत स्वातंत्र्य होवून 75 वर्ष पूर्ण होतील. म्हणून हे संपूर्ण वर्ष आपण स्वातंत्र्याचा मृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mohotsav) म्हणून साजरा करत आहोत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांनी कार्यालयासह घरोघरी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत करणे हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mohotsav) कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तरी फक्त घरोघरी झेंडा फडकवूनच नाही तर ही अमृत महोत्सवा निमित्त साजरी करण्यात येत असलेली ही मोहीम तुम्ही डिजीटल (Digital) माध्यमातून देखील साजरी करु शकता.
काल म्हणजेच 31 जुलै रोजी प्रसारीत झालेल्या मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमात खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) या संबंधी माहिती दिली आहे. 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान स्वतच्या सोशल मिडीया प्लॉटफॉर्मचा (Social Media Platform) प्रोफाईल पिक्चर (Profile Picture) बदलून या 13 दिवसाच्या कालवधीत तिरंगा प्रोफाईल पिक्चर म्हणून ठेवण्याचं आवहान पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. तर तुम्ही तुमच्या सोशल मिडीया म्हणजेच फेसबूक (Facebook), व्हॉट्स अॅप (Whats App),इंस्टाग्रामचे (Instagram), ट्वीटरचे (Twitter) प्रोफाईल पिक्चर कसे बदलायचे याविषयीची खास माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. (हे ही वाचा:- 5G Service: भारतात ऑक्टोबरपासून 5G सेवा, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा)
It is a special 2nd August today! At a time when we are marking Azadi Ka Amrit Mahotsav, our nation is all set for #HarGharTiranga, a collective movement to celebrate our Tricolour. I have changed the DP on my social media pages and urge you all to do the same. pic.twitter.com/y9ljGmtZMk
— Narendra Modi (@narendramodi) August 2, 2022
तिरंगा व्हॉट्सअपचा डिसप्ले पिक्चर ठेवायची सोपी पध्दत:-
1. तुमच्या मोबाईमध्ये व्हॉट्सअप सुरु करा.
2. स्कीनच्या उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला तुम्हाला तीन डॉट दिसतील त्यावर क्लीक करा.
3. त्या तीन डॉटवर क्लीक केल्यास तुम्हाला न्यू ग्रूप, न्यू ब्रॉडकास्ट, लिंक डिव्हाईस, स्टेअर मेसेज, पेमेंट आणि सेटींग्स असे ५ विकल्प तुम्हाला दिसतील त्यापैकी सेटींग्सवर क्लीक करा.
4. तिकडे तुम्हाला तुमचा डिसप्ले पिक्चर दिसेल त्यावर क्लीक करा.
5. त्याखाली कॅमेराच्या साइनवर क्लीक करुन तुम्ही तुमचा डिसप्ले पिक्चर बदलू शकता.
याच पध्दतीने तुम्ही तुमचा फेसबूक, इंस्टाग्रामसह डिसप्ले पिक्चर सहज बदलू शकता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)