Tik Tok (Photo Credits-Gettey Images)

भारतात सर्वाधिक प्रसिद्धी मिळवलेला टिक-टॉक ऍप (TikTok) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. टिक-टॉक स्टार फैजल सिद्दिकीने (Faizal Siddiqui) बनवलेल्या व्हिडिओला संपूर्ण देशातून विरोध होताना दिसत आहे. तसेच भारतात टिक-टॉक बंद करा, अशा मागणीने जोर धरला आहे. एवढेच नव्हेतर, राष्ट्रिय महिला आयोगानेही या व्हिडिओची दखल घेतली आहे. सध्या हा व्हिडिओ ट्विटरसह टिक-टॉकवर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत महिलांवर होणाऱ्या ऍसिल हल्लाचे समर्थन करण्यात आले आहे, असा आरोप सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेक वापरकर्ते करत आहेत. महत्वाचे म्हणजे, या व्हिडिओवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून टिकटॉक बंद करण्याची मागणी होऊ लागली आहे.

टीक टॉक अॅपच्या माध्यामातून अनेक युजर्स अभिनय सादर करतात. भारतात 12 कोटींहून अधिकजण टिकटॉक ऍपचा वापर करताता. दरम्यान, अनेक लोकांनी मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. मात्र, टिक-टॉक स्टार फैजल सिद्दिकी याने नुकताच बनवलेल्या एका व्हिडिओला संपूर्ण देशातून विरोध दर्शवला जात आहे. सध्या महिलांवर होणाऱ्या अन्यायांमुळे महिला आयोग चिंतेत आहे. परंतु, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिलो ऍडिल हल्ल्याचे समर्थन करत आहे. या व्हिडिओमुळे समाजातील लोकांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो, असे राष्ट्रीय महिला आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. तसेच हा व्हिडिओ तातडीने टिक-टॉक वरन हटवून टाकावे, अशीही मागणी केली आहे. हे देखील वाचा- TikTok Video: मुजीबुर रहमान याचा बलात्काराला प्रोत्साहन देणारा व्हिडीओ पाहून NCW च्या रेखा शर्मा यांची केंद्र सरकारला टिकटॉक बॅन करण्याची विनंती

व्हडिओ- 

भारतात टिक टॉकचे 12 कोटी वापरकर्ते आहेत. त्यामुळे चीनच्या या कंपनीसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. मात्र, काही वापरकर्ते चुकीचा व्हिडिओ बनवून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे अनेक घटना समोर आल्या आहेत.