Tiger Viral Video: बर्फ जमलेल्या तलावावर चालताना घडले असे काही आणि चक्क वाघ ही घाबरला; पहा व्हिडिओ
Tiger Viral Video (Image Credits: Twitter)

वाघ म्हटलं की शक्तीशाली, हिंस्रक, रुबाबदार अशा वाघाची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. पण तुम्ही कधी वाघाला घाबरताना पाहिले आहे?  सध्या सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक वाघ चक्क घाबरलेला, बिचकलेला दिसत आहे. व्हिडिओत एक वाघ बर्फ जमलेल्या तलावापाशी फिरताना दिसत आहे. तलावावर बर्फाचा पातळ थर तयार झाला होता. वाघ त्यावरुन चालताना तो थर तुटला आणि चक्क वाघही घाबरला. बर्फाच्या थंड पाण्यात आपण पडतोय की काय असं वाटून बिचकलेला वाघ तेथून पटकन बाहेर पडतो. हा व्हिडिओ नेचर एंड एनिमल्स या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. "बर्फाच्या पातळ थरावर चालताना त्याच्यासोबत काही वाईट घडू शकतं?," असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 96 हजार व्ह्युज मिळाले असून 3 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल, वाघ बर्फाच्या पातळ थरावरुन चालत असताना तो थर तुटतो आणि वाघ थंड पाण्यात पडतो. त्यानंतर घाबरलेला वाघ तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करु लागतो. तेवढ्यात त्याची नजर समोर असलेल्या जमिनीवर जाते आणि क्षणार्थात तो तिथे उडी घेतो. (Tiger Crying and Giggling Viral Video: माकड आणि पक्ष्यांचे आवाज काढतो हा वाघ; व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य)

पहा व्हिडिओ:

सोशल मीडियात हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रीया येत आहेत. हा व्हिडिओ पाहून काही युजर्संना हसू अनावर झाले आहे. तर काहींनी हा वाघ मांजरीप्रमाणे घाबरत असल्याचे म्हटले आहे.