Tiger Crying and Giggling Viral Video: माकड आणि पक्ष्यांचे आवाज काढतो हा वाघ; व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
साइबेरियन बाघ, (फोटो क्रेडिट्स: साइबेरियन टाइम्स)

Tiger Crying and Giggling Viral Video: आत्तापर्यंत आपण वाघाची गर्जना ऐकली असेलचं. परंतु, आपण वानर आणि पक्ष्यांचा आवाज काढणारा वाघ पाहिला आहे का? बरनाउल (Barnaul) मध्ये Lesnaya Skazka प्राणिसंग्रहालयात 8 महिन्यांच्या वाघाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये शावक हाईपीचवर पक्ष्यांचा आवाज आणि वानराचा आवाज काढताना दिसत आहे. प्राणीसंग्रहालयात वाघाचे हे पिल्लू वेगवेगळे आवाज काढण्यासाठी प्रसिद्ध आहे. हा वाघ कधी माकडांचा आवाज तर कधी पक्ष्यांच्या किलबिलाटांचा आवाज काढतो. आईचे लक्ष वेधण्यासाठी हे शावक असे आवाज काढतो. (वाचा - रेस्टॉरंटमध्ये छुप्या पद्धतीने घुसलेल्या पक्षाने चोरले चिप्सचे पाकिट, त्यानंतर झाला फरार; Watch Viral Video)

या वाघाचा आवाज ऐकून तुम्हाला वाटेल की, त्याच्या गळ्यात अडचण आहे. पण तसे नाही, त्याचा घसा अगदी बरोबर आहे. बर्ड हाऊसच्या पोस्टनुसार, हा शावक जन्मानंतरचं असे आवाज करतो. तो आपल्या आईचे लक्ष विचलित करण्यासाठी असे आवाज काढतो. सायबेरियन टाईम्सने या वाघाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो वेगवेगळे आवाज काढताना दिसत आहे.

प्राणिसंग्रहालयाने हा व्हिडिओ खरा असण्याची पुष्टी केली आहे. या वाघाचा आवाज तयार करण्यात आलेला नाही. या वाघाचा जन्म जून 2020 च्या सुरुवातीस पालक शेरखान आणि बघेरा यांच्या चार मुलांसमवेत झाला होता. अमूर वाघ ही जगातील सर्वात मोठी मांजर प्रजाती आहे.