Tiger Kills Dog | (Photo Credit - Twitter)

रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील (Ranthambore national park) एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. IRS अधिकारी अंकुर राप्रिया (IRS officer Ankur Rapria) यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत एक वाघ कुत्र्याची शिकार ( Tiger Kills Dog Viral Video) करताना दिसतो आहे. जगल सफरीवर गेलेल्या लोकांसाठी वन्य प्राणी दिसणे ही आनंदाची बाब. पण तो प्राणी जर शिकार करताना दिसला तर? अनेकांसाठी ती आनंदाची पर्वणी असते. पण ही पर्वणी तितकीच अंगावर शहारा आणणारी देखील असते. पाहा व्हिडिओ.

व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, हा व्हिडिओ कोणा पर्यटकांनी दूरुनच कॅमेऱ्यात कैद केला आहे. व्हिडिओ सुरु होतो तेव्हा दिसते की, एक वाघ जमिनीवर झोपलेला आहे. याच झोपलेल्या वाघाच्या समोरुन एक कुत्रा जाण्याचा प्रयत्न करत आहे. काही क्षणांनंतर वाघ उठतो. तर कुत्रा त्याच्यावर भुंकतो. पण पुढच्याच क्षणात वाघ कुत्र्यावर झडप घालतो. कुत्र्याचा थेट गळाच पकडतो. कुत्र्याची शिकार करतानाचा हा अत्यंत थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा, Bear vs Tiger Viral Video: अस्वल आणि वाघ यांच्यात जोरदार लढाई, कोण जिंकले? (पाहा व्हिडिओ))

ट्विट

IRS अधिकारी अंकुर राप्रिया यांनी @irsankurrapria या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना ट्विटरपोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, वाघ झोपला असला तरी त्याला हलक्यात घेऊ नका. रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील T120 वाघाने ही शिकार केली आहे.

दरम्यन, सोशल मीडियावर हा व्हिडिओ 30 जून रोजी शेअर केला. हा व्हिडिओ शेअर केल्यापासून आतापर्यंत 140k पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. ही संख्या अजूनही वाढत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियांवर अनेकांनी आपल्या वेधना व्यक्त केल्या आहेत.