Viral Video: घरासमोर पार्क केलेली रोल्स रॉयस घेऊन चोरांनी अवघ्या 30 सेकंदात काढला पळ; घटना CCTV मध्ये कैद, पहा
Rolls Royce Theft (PC - X/@ViralRedditVids)

Viral Video: आजपर्यंत तुम्ही चोरीच्या अनेक घटना पाहिल्या किंवा ऐकल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला अशी हायटेक चोरी (Hi-tech Theft) दाखवणार आहोत जे पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही. हे प्रकरण ब्रिटनमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. येथे दोन चोरट्यांनी घरासमोर पार्क केलेली रोल्स रॉयस (Rolls Royce) कार हायटेक पद्धतीने 30 सेकंदात चोरली. या चोरीच्या घटनेचा व्हिडिओ घरासमोर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये एक 'रोल्स रॉयस' कार एका घरासमोर उभी असलेली दिसत आहे. त्याचवेळी एका चोराने एका हातात अँटेना धरला आहे. चोर अँटेना घेऊन गाडीच्या चाव्या ठेवलेल्या खोलीच्या गेटजवळ जातो. मग तो किल्लीने अँटेनाचा सिग्नल ट्रेस करतो आणि त्यानंतर लगेच गाडीचे दिवे लागतात. त्यानंतर दोन्ही चोरटे कार घेऊन पळून गेले. (हेही वाचा -NMMT Bus Hits Several Vehicles In Uran: उरणमधील खोपटा कोप्रोली रोडवर भरधाव बसची अनेक वाहनांना धडक; एक ठार, पहा अपघाताचा थरार)

पहा व्हिडिओ -

चोरीचे हे तंत्र पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत फक्त चावी वापरूनच कारची चोरी केली जात होती, परंतु अशा प्रकारची ही पहिलीच हायटेक चोरी आहे, ज्यात चावी मालकाकडे असली तरी चोरटे कार घेऊन फरार झाले आहेत. (हेही वाचा - Rail Accident Viral Video: ट्रेन खाली आला प्रवासी प्लॅटफॉर्मवरील गर्दीने ट्रेनला धक्का मारत केली मदत; वाशी स्थानकातील घटना ( Watch Video))

या चोरीमध्ये चोरट्यांनी त्यांच्या शस्त्राप्रमाणेच तंत्रज्ञान वापरले. जे आजकाल अनेक कार कंपन्यांनी त्यांच्या वाहनांमध्ये देण्यास सुरुवात केली आहे. या चोरट्यांनी कारमध्ये उपलब्ध असलेल्या अनलॉक फीचरचा फायदा घेतला. या घटनेचा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @ViralRedditVids नावाच्या खात्यावर शेअर करण्यात आला आहे.