Viral Video: पाऊल पुढे पडले आणि थोडक्यात प्राण वाचले, थररारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video

कधी कधी आयुष्यात अशा घटना घडतात ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. विशेष म्हणजे या घटना अशा असतात की, त्याबाबत आपल्याला कल्पनाही नसते. पण या घटनेचा 'आंखों देखा हाल' म्हणजेच या घटना प्रत्यक्षात घडताना पाहायला मिळाल्या तर थरकाप झाल्याशिवाय राहात नाही. सोशल मीडियावर (Social Media) अशीच एक घटना व्हायरल झाली आहे. जी पाहून अनेकांचा थरकाप होतो आहे. खरे तर हा एक व्हिडिओ आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, रस्त्यावरुन चालणाऱ्या एका व्यक्तीच्या मृत्यू किंवा अपघात किती जवळ आला होता. परंतू, तो त्यातून कसा थोडक्यात वाचला.

देव तारी त्याला कोण मारी, अशी एक म्हण आपल्याकडे आहे. या म्हणीचा पूरेपूर प्रत्ययच जणू या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो. तुम्हाला जर या म्हणीचा प्रत्यय कधी आला नसेल तर हा व्हिडिओ जरुर पाहा. व्हिडिओत पाहायला मिळते की, रस्ता ओलांडून एक व्यक्ती दुकानाच्या दिशेने येत असतो. रस्त्याकडेला बंद गटर असते. या गटारावरुन तो दुकानाच्या दिशेने येतो. योगायोगाने दुकानाचा सीसीटीव्ही कॅमेराही त्याच दिशने असल्याने ही घटना कैद होते. तर हा व्यक्ती गटर ओलांडून पुढे येतो त्याने एकच पाऊल पुढे टाकलेले असते. मागचे काहीसे हवेतच असते किंवा तो अजून उचलायचाही असतो. इतक्यात त्या गटारीचा स्लॅब कोसळतो. तो खड्ड्यात कोसळणारच पण तो थोडक्यात वाचतो. (हेही वाचा, UAE Flash Floods Viral Video: यूएईमध्ये महापूर, लाखो रुपयांची लग्जरी वाहने पाण्यात, कोट्यवधी रुपयांचा डोळ्यासमोर चुराडा (पाहा व्हिडिओ))

ट्विट

व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजात धस्स व्हायला होतो आहे. सागर नावाच्या एका युवकाने हा व्हिडिओ ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आली आहे की, जेव्हा यमराज लंच ब्रेकवर असतो तेव्हा असे काही घडते. काही युजर्सनी यावर अत्यंत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याला धक्कादायक घटना म्हटले आहे.