कोलंबिया (Colombia) येथे ESPN FC रेडिओ शो दरम्यान एक भयंकर घटना घडली. स्टुडिओ सेटचा (Studio Set) एक भाग कोसळून टीव्ही अंकर (TV Anchor) जखमी झाला आहे. या ESPN पत्रकाराचे नाव Carlos Orduz असे आहे. सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. या भयंकर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओला 10 लाखाहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. (Viral Video : जेव्हा Live Anchoring दरम्यान पाकिस्तानी पत्रकारावर आला आगीचा गोळा)
लाईव्ह शो दरम्यान सर्व क्रीडा तज्ज्ञ आपआपल्या खुर्च्यांवर बसले होते. अचानक स्टुडिओच्या सेटमधील एक भाग Carlos च्या पाठीवर पडला आणि तो समोरील डेस्कवर आदळला गेला. कॅमेरामॅनने हा शॉट लगेच कट केला. या अचानक झालेल्या घटनेमुळे Carlos जागेवरुन हलू शकत नव्हता. त्यानंतर चॅनलने जाहीराती चालू केल्या.
पहा व्हिडिओ:
UPDATE: ESPN anchor Carlos Orduz reassures viewers he is fine after being hit by falling set piece: “I must tell you I am fine, thank God, after a medical check-up and examination, any issue was ruled out, only a bruise and blow to the nose (no fracture).”
— Mike Sington (@MikeSington) March 10, 2021
"ज्यांनी माझ्याबद्दल चौकशी केली त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की, देवकृपेने मी सुखरुप आहे. मला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. आणि सर्वांनी केलेल्या प्रार्थनेबद्दल मी आभारी आहे," असे Carlos Orduz याने स्पॅनिश भाषेत ट्विट करत म्हटले आहे.