Pakistani journalist hit by a ball of fire (Photo credits: Twitter)

पाकिस्तानमध्ये (Pakistan) स्टुडिओत लाईव्ह शोमध्ये असताना एका पत्रकारावर आगीचा गोळा ( बॉल) फेकल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही क्षणात होत्याचं नव्हतं करू शकणारा हा प्रकार धक्कादायक आहे. एका पाकिस्तानी महिला पत्रकाराने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.लाईव्ह शोमध्ये अचानक घडलेल्या या प्रकारानंतर अँकरदेखील घाबरल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पत्रकार दहशतवादावर चर्चा करत होता. एका पॅनलिस्ट सोबत तो बोलत होता. चर्चेदरम्यान एकदा जोरदार आवाज झाला. शो मध्ये असला तरीही अँकर एक क्षण दचकला. नंतर काही वेळातच त्याच्यादिशेने आगीच्या गोळ्या सदृश्य बॉल आला. बेसावध असलेला पत्रकार तातडीने उठला. पॅनलिस्ट व्यक्तीच लक्ष नसल्याने तो बोलतच राहिला.

पाकिस्तानी अनेक न्यूज अँकर्सचे व्हिडीओ यापूर्वीही व्हायरल झाले आहे. आक्षेपार्ह वक्तव्य, खुणा केल्यापासून ते चुकीची माहिती लिहण्यापर्यत अनेक गोष्टींवरून पाकिस्तानी मीडिया सोशल मीडियात जगभर ट्रोल होत असते.