Student Union Election in Rajasthan: राजस्थान (Rajasthan)मधील विविध विद्यापीठे आणि त्यांच्या संलग्न महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका (Student Union Election) होत आहेत. तब्बल 2 वर्षांनंतर येथे विद्यार्थी संघाच्या निवडणुका होत आहेत. आज सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार असून शनिवारी मतमोजणी होणार आहे. त्याचवेळी शनिवारी दुपारपर्यंत निकाल येण्यास सुरुवात होईल.
दरम्यान, राजस्थानमधील भरतपूर (Bharatpur) आणि ढोलपूर (Dholpur) मधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे अनेक विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांचे हात पकडून त्यांचे पाय पकडून मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. हा व्हिडिओ पाहून सगळेचं थक्क झाले आहेत. (हेही वाचा - OMG! मध्य प्रदेशातील Bakswaha मध्ये हातपंपातून पाण्यासह बाहेर फेकली जात आहे आग; विचित्र घटनेने ग्रामस्थांमध्ये उडाली खळबळ; Watch Viral Video)
जयपूर येथील राजस्थान विद्यापीठ या राज्याच्या प्रमुख शैक्षणिक संस्थेमध्ये सुमारे 20,700 विद्यार्थी आपला मताधिकार वापरण्यास सक्षम असतील. विद्यापीठाच्या प्रवक्त्याने सांगितले की, राज्यभरातील सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांना त्यांचे प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळणार आहे. मतदानासाठी प्रशासनाने 91 मतदान केंद्रे उभारली आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच उमेदवार जोरदार प्रयत्न करत आहेत.
ABVP उम्मीदवारों ने वोट के लिए लड़कियों के पकड़े पैर... कहीं दंडवत प्रणाम, राजस्थान छात्र संघ चुनाव में अजब नजारा !! pic.twitter.com/uBayfUekzV
— MP Youth Congress (@IYCMadhya) August 26, 2022
भरतपूरच्या महाराणी श्री जाया कॉलेज परिसरातून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कॉलेजमधील एक उमेदवार रस्त्याच्या मधोमध विद्यार्थ्यांचे पाय धरून नतमस्तक होताना दिसतो. जिल्ह्यातील एकूण 12 महाविद्यालयांसाठी विद्यार्थी संघाच्या निवडणुका होत आहेत.
राजस्थान विद्यापीठाच्या अध्यक्षपदासाठी एनएसयूआयकडून रितू बराला, एबीव्हीपीकडून नरेंद्र यादव, निहारिका जोरवाल, निर्मल चौधरी, प्रतापभानू मीना आणि हितेश्वर बैरवा हे रिंगणात आहेत. निहारिका ही राज्य सरकारमधील मंत्री मुरारी लाल मीना यांची मुलगी आहे. जिने एनएसयूआयचे तिकीट न मिळाल्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मंगळवारी उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान अभाविपच्या दोन उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले. मात्र, नंतर दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध मानले गेले.