Tamil Nadu Accident Video: तामिळनाडूमध्ये भरधाव  स्कूटर मॅनहोलच्या झाकणाला धडकली; दुचाकीवरील दोन महिला गंभीर जखमी (Watch Video)
Tamil Nadu Accident Video (PC - X/@viraldaires)

Tamil Nadu Accident Video: तामिळनाडूतील मदुराईमध्ये एक महिला आपल्या मुलीसोबत स्कूटरवरून जात होती. दरम्यान, रस्त्यावर कमी प्रकाशामुळे मॅनहोलच्या कव्हर (Manhole Cover) ला धडक बसली. त्यामुळे महिला तसेच तिची मुलगी जमिनीवर पडली. या अपघातात दोघींना दुखापत झाली. सुदैवाने त्यांचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धडक झाल्यानंतर महिला आणि तिची मुलगी जमिनीवर पडताना दिसत आहेत.

शनिवारी रात्री शहराच्या विलापुरम परिसराजवळील रस्त्यावरील दृश्यमानता कमी असल्याने मॅनहोलच्या झाकणाला स्कूटर आदळल्याने हा अपघात झाला. यानंतर स्कूटर खाली पडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या फुटेजमध्ये रस्त्यावरून जाणारे लोक या दोन महिलांच्या मदतीसाठी येत असल्याचे दिसत आहे. (हेही वाचा - Man Makes Reel In Middle Of Road: दिल्लीत रस्त्याच्या मधोमध खूर्ची टाकून रील बनवत होता तरुण; पोलिसांनी केली अटक, पहा व्हिडिओ)

पहा व्हिडिओ -

या अपघातात महिला व तिची मुलगी किरकोळ जखमी झाल्या आहेत. मॅनहोलमुळे रस्ता वापरणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे स्थानिकांनी म्हटलं आहे.