Marathi Tomane Quotes and Status: नाती जपायची असतील तर त्यामध्ये थोडी मजा, मस्ती आलीचं. अनेकदा आपले नातेवाईक आपल्याबद्दल गैरसमज करून घेतात आणि नातेवाई किंवा मित्रपरिवारात आपल्याला त्यांचे म्हणणे समजते. परंतु, आपण त्यांना थेट उत्तर देऊ शकतं नाही. कारण, असं केलं तर नात्यामध्ये दरी पडण्याची शक्यता असते. म्हणून अशावेळी तुम्ही Whatsapp Status, Facebook Messages द्वारे खोचक टोमणे (Marathi Tomane) शेअर करून त्यांना प्रत्त्यूतर देऊ शकता.
खरं तर टोमणा (Tomane) मारणे ही एक कला आहे. अनेकदा आपले म्हणणे संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी टोमणा खूपचं उपयोगी पडतो. अशाने वाद टाळता येतो आणि ज्या व्यक्तीसाठी तो टोमणा असतो, त्याला आपल्या भावना पोहोचतात. सध्या लोक सोशल मीडियाद्वारे असे खोचक टोमणे शेअर करताना दिसतात. तुम्ही देखील लेस्टेस्ली मराठीने तयार केलेले खालील खास टोमणे शेअर करून तुमच्या मित्र-परिवारास शेअर करू शकता. हेही वाचा, Political Status and Marathi Taunt: राजकीय स्टेटस आणि मराठी टोमणे)
मोठी स्वप्नं पाहणारे अनेक लोक सकाळी 10 वाजता उठतात.
दात निट घासले तर तुमच्या असण्यासोबतच तुमचं हसणंही लोकांना आवडतं.
चांगल्या कामात मांजरे कमी माणसेच अधिक आडवी येतात.
लोकं बोटंच दाखवतात म्हणून नाराज नका होऊ. जे आपल्याला घाबरतात तेच दुरुन बोट दाखवतात.
दोस्ताची बाईक म्हणजे दुष्काळी विहीर. कायम बिनपाण्याची.
टोमणे मारणं ही एक कला आहे. पण मारलेला टोमणा समजून न समजल्या सारखं वागणं, ही त्याहून ही मोठी कला आहे.
प्रत्येकालाचं वेळेवर टोमणा मारता येईल असं नाही. मात्र, ज्या व्यक्तीचे भाषेवर प्रभुत्व आहे, अशी व्यक्ती टोमणा मारण्यात तरबेज असू शकते. टोमणे मारणे ही एक कला असून यामुळे समोरच्या व्यक्तीला रागही येत नाही. तसेच ज्या व्यक्तीसाठी हा टोमणा असतो त्या व्यक्तीला तो समजतो.