Snake Viral Video: पठ्ठ्याने जंगलात सोडले पोतं भरुन साप, जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल
Snakes | Image Used for representational purpose only । (Photo Credits: Pixabay)

'साप' पाहणं सोडा, केवळ शब्द जरी कानावर पडला तर अनेकांना घाबरण्यासाठी तेवढे कारण पुरेसे ठरते. अपवाद फक्त सर्पमित्रांचा. असाच एक व्हिडिओ व्हायरल (Snake Viral Video) झाला आहे. जो पाहून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. या व्हिडिओत पाहायला मिळते की, एक व्यक्ती, जो सर्पमित्र आहे. हा पठ्ठ्या पोतंभर साप घेऊन जंगलात आला आहे आणि त्याने या सर्व सापांना त्यांच्या नैसर्गिक अदिवासात सोडले आहे. धक्कादायक म्हणजे धाग्यांचा गुंता सोडवावा तसा हा पठ्ठ्या या सापांचा गुंताही सोडवताना व्हिडिओत पाहायला मिळतो हे विशेष.

डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असा हा धक्कादायक व्हिडिओ @snakebytestv नावाच्या Instagram हँडल वरुन शेअर करण्यात आला आहे. अर्थात हा व्हिडिओ जुनाच आहे. पण नेटीझन्सचे जोरदार लक्ष वेधून घेतो आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता, एक व्यक्ती जंगलाच्या हिरवळीत उभा दिसतो. त्याच्या हातात सापांनी भरलेली एक मोठी पिशवी आहे. तो नागांना जंगलात सोडण्याच्या तयारीत असताना पाहणाऱ्यांच्या मनात काहीसा तनाव निर्माण होतो. तो व्यक्ती एक दीर्घ श्वास घेऊन हळूवारपणे पिशवी सोडतो आणि अचानक, विविध आकार आणि रंगांचे साप भरपूर प्रमाणात बाहेर पडतात.

व्हिडिओ

श्वास गोठून जाईल असे हे व्हिडिओतील दृश्य अनेकांना विचलीत करु शकते. पिशवीचे तोंड उघडताच साप पांगू लागतात. साप पांगत असताना, तो आपल्या उघड्या हातांनी त्यांना हाताळण्याचे धाडसी कृत्य करतो आहे. एक एक करून, तो प्राण्यांना नाजूकपणे विलग करतो. त्यांना जंगलात शांतपणे सोडतो. त्याच्या हालचालींमध्ये आत्मविश्वास पाहता तो सराईत सर्पमित्र आहे. त्याने यापूर्वी अशा अनेक मोहिमा राबवल्यात असे वाटते.