अबब! सापाने चक्क AK- 47 बंदूक खाल्ली? पहा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे मजेशीर फोटो
Snake swallows AK-47 (Photo Credits: Twitter)

Snake Swallowed an AK-47? एखाद्या विचित्र ठिकाणी साप सापडल्याचे आपण ऐकले असेल किंवा वाचले आहे आणि काही त्रासदायक सापांचे फोटो देखील पहिले असतील. परंतु, नुकताच एका अशा सापाचा फोटो समोर आला आहे जो पाहून आपल्याला असं वाटेल की त्या सापाने एखादी ए के 47 बंदूक गिळली आहे. अशा या वेगळ्याच सापाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो नक्की कुठे काढण्यात आले आहेत व कोणी काढले आहेत हे अद्याप तरी समजलेलं नाही परंतु हे फोटो जवळजवळ 5 महिन्यांपूर्वीचे आहेत आणि आता व्हायरल होताना दिसत आहेत. अनेक लोक हे फोटो पाहून आश्चर्यचकित आहेत की असा साप खरोखरच आढळतो की हे एडिट केलेले फोटो आहेत.

इंटरनेटवर विचित्र फोटोंचा इतका मोठा संग्रह आहे की आपण पुढच्या वेळी सोशल मीडियावर स्क्रोल करत असताना काय दिसेल याचा आपण अंदाजदेखील लावू शकत नाही. एके-47 गिळणाऱ्या या सापाचे फोटोंनी देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ट्विटरवर @paeh_judin या वापरकर्त्याने हे फोटो शेअर केले असून एका दिवसात त्याला 13,000 हून अधिक रिट्विट आणि 11,000 लाईक्स मिळाले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी या फोटोंवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

दोन वाघांच्या झुंजीचे थरारक दृश्य पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याखेरीज राहणार नाही, Watch Video

असे अनेक साप आहेत जे आपला शिकार खाताच त्या शिकारीचा आकार त्यांच्या पूर्ण शरीरावर दिसतो येतो. परंतु, या सापाने खरंच एके 47 गिळली आहे की नाही हे मात्र माहित नाही. थोडक्यात आम्हाला या फोटोंची विश्वसनीयता माहित नाही परंतु त्यावरील प्रतिक्रिया मात्र मजेदार आहेत.