गाजियाबाद मधील ATM मशीन मध्ये शिरला साप; थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
Snake spotted inside ATM in Ghaziabad (Photo Credits: Twitter)

एटीएम (ATM) मध्ये साप आढळेल अशी कल्पनाही कोणी कधी केली नसेल. मात्र हा अनुभव  गाजियाबाद (Ghaziabad) मधील गोविंदपुरम (Govindapuram) येथील रहिवाशांनी घेतला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून या व्हिडिओत ATM मशिनमध्ये साप पाहायला मिळत आहे. ही घटना गोविंदपुरम येथील असून हा साप डेहरादून पब्लिक स्कूल जवळील जे. ब्लॉक मार्केटमधील एका प्रायव्हेट बँकेच्या एटीएम मध्ये आढळला. एटीएममध्ये साप दिसताच तेथे लोकांची गर्दी जमा झाली. हा साप एटीएममधून  बाहेर येऊ नये आणि त्यामुळे कोणालाही धोका निर्माण होऊ नये म्हणून एटीएमच्या गार्डने एटीएमचा दरवाजा बाहेरुन बंद केला. एका ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला असून याबद्दल माहिती देताना म्हटले की, हाय, "तुघलकाबादच्या आयसीआयसीआय एटीएममध्ये आज (10 मे) विशेष पाहुण्याने हजेरी लावली होती."

रिपोर्ट्सनुसार, काही लोकांनी खासदार वि. के. सिंह यांना मदतीसाठी फोन केला. खासदारांच्या ऑफिसमधून ही माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने गोविंदपुरम येथे आपली टीम पाठवली. त्या टीमने सापाची एटीएममधून सुखरुप सुटका केली.

पहा व्हिडिओ:

यापूर्वी अशा अनेक घटना समोर आल्या असून एका स्कूटीच्या हॅंडलमध्ये कोब्रा उडाल्याने खळबळ उडाली होती. नंतर त्या स्कूटीचे हँडल ओपन करुन सापला रेक्स्यू करण्यात आले. अशा प्रकारचा अजून एक व्हिडिओ ओडिशा मधून समोर आला होता. ओडिशा मधील धेंकनाल जिल्ह्यामध्ये जुनाट पाईप्समध्ये 6 पायथन्स आढळ्याचे समोर आले होते. त्यापैकी एक साप हा 18 फूट इतका लांब असून त्यांची सुटका करण्यासाठी JCB चा वापर करण्यात आला होता.