Scooty च्या हँडल मध्ये फणा काढून बसला होता कोब्रा साप; अंगावर काटे आणणारा 'हा' व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Watch Video)
Snake found inside handle of scooty (Photo Credits: Satish Yes YouTube)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका नव्या व्हिडीओ मध्ये चक्क एका स्कुटीच्या हॅण्डल मधून कोब्रा हा महाभयंकर साप बाहेर येत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ अवघ्या काही सेकेंडचा जरी असला तरी बघता क्षणी कोणाच्याही अंगावर काटा आणेल असा आहे. सहसा उन्हाळयाच्या महिन्यांमध्ये साप, पाली,यांसारखे प्राणी बाहेर येत नाहीत पण मागील काही दिवसात देशभरात काही ठिकाणी सतत अवकाळी पाऊस, कधी तीव्र उष्णता तर कधी काहीशी थंडी असे मिश्रित वातावरण असल्याने हा साप आपल्या बिळातून बाहेर आला असल्याचा अंदाज आहे. मात्र हा साप स्कुटीच्या हॅण्डल मध्ये कसा गेला याबद्दल कोणाला काहीच कल्पना नाही. ऑस्ट्रेलियातील रिपोर्टरच्या खांद्यावर अचानक पडला साप, त्यानंतर जे घडलं ते तुम्हीचं पहा; Watch Video

सोशल मीडियावर हा व्हायरल होणारा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबतही अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र व्हिडीओ मध्ये दिसत आसनराई दृश्यच इतके भयंकर आहे की अन्य चौकशी करण्याकडे कोणाचे लक्ष सुद्धा जाणार नाही. व्हिडीओ मध्ये तुम्हीही पाहू शकता की, हा साप स्कुटीच्या हॅण्डल मधून फणा काढून बाहेर येत असतो, लोक घाबरून किंचाळायला सुरुवात करतात तर काही जण या घाबरलेल्या अवस्थेतही त्याचे शूटिंग करतात. प्रत्यक्षच पहा हा व्हायरल व्हिडीओ..

दरम्यान, अशाप्रकारचे काही प्रकार यापूर्वीही अनेकदा पाहायला मिळाले आहेत, कधी कोणाच्या घरात तर कधी गाडीत, तर कधी वाजिद विचारही करता येणार नाही अशा ठिकाणी साप व अन्य भयंकर प्राणी आढळून आले आहेत. आता यावर उपाय म्हणजे इतकाच की गाडी सुरु करण्याच्या आधी प्रत्येकाने त्याची नीट तपासणी करून घ्यायला हवी, खाण्याचे पदार्थ किंवा उग्र वास असणाऱ्या गोष्टी आपल्या गाडीत नसतील याची खबरदारी घ्यायला हवी. आपल्या वाहनांची स्वच्छता बाळगणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.