Sleeping Man Mistaken As Dead Body: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मध्ये कधी काही होईल सांंगता येत नाही असे म्हंंटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही, हा मुद्दा सिद्ध करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता हा व्हिडिओ पाहुन हसावंं की हैराण व्हावं हे तुम्ही ठरवा, तर झालंं असं की, युपी च्या गाझियाबाद (Ghaziabad) मध्ये एक व्यक्ती निवांंतपणे रस्त्याच्या कडेला अंगावर पांंढरा कपडा ओढुन झोपला होता. आता त्याचा निवांंतपणा इतका होता की त्याची जराही हालचाली होत नव्हती अर्थात तुम्ही या परिस्थिती मध्ये असता तर काय विचार केला असतात? बरोबर तसाच विचार करुन रस्त्यावर येणार्या जाणार्या प्रत्येकाने त्याला मृतदेह समजले. काहीच वेळात त्या ठिकाणी गर्दी जमा झाली आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या अॅंंगल ने त्य निद्रस्त देहाला पाहायला तपासायला लागला. काही वेळात पोलिसही तिथे पोहचले आणि त्यांंच्या या निरिक्षणामध्येच हा झोपलेला माणुन उठुन उभा राहिला.
अर्थात आतापर्यंत मेलाय असे वाटणारा माणुस उठुन उभा राहिलेला बघुन सगळ्यांंमध्ये एकच गोंंधळ सुरु झाला. हा सगळा प्रकार एका कॅमेर्यात कैद झाला आणि सौरभ त्रिवेदी या अकाउंट वरुन शेअर केला गेला. बिचार्याला सुखाने झोपु पण दिले नाही असे कॅप्शन देत हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तुम्हीही हा व्हिडिओ आवश्य पाहा.
पहा व्हिडिओ
A man sleeping on road side was mistaken as dead body caused panic in Ghaziabad...लोग चैन से सोने भी नहीं देते. 😀 pic.twitter.com/UPMbeK9Csr
— Saurabh Trivedi (@saurabh3vedi) September 8, 2020
दरम्यान या व्हिडिओवरुन काहींंना त्या रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीची दया सुद्धा आल्याचे दिसतेय. ही दया अनेकांंनी कमेंंटस मध्ये लिहुन दाखवली आहे. तो रस्त्यावर झोपलेला माणुस काय परिस्थितीतुन जात असेल आपल्या घरी बेड असतात आपण खुश असतो पण आपल्याच आजुबाजुला असेही व्यक्ती आहेत हे पाहुन दुःख वाटते. अशा आशयाच्या अनेक कमेंंटस या पोस्ट वर पाहायला मिळत आहेत.