आजकाल व्हायरल होण्यासाठी कारणांची गरज भासत नाही. एखादे वाक्य, चेहऱ्यावरील हावभाव, एखादे गाणे किंवा अगदी एखादा विशिष्ठ प्रकारचे नृत्यदेखील तुम्हाला लोकप्रिय बनवू शकते. काही दिवसांपूर्वी याच पठडीतला किकी चॅलेंज हा प्रकार आला होता. लोक चालत्या गाडीशी संलग्न उभे राहून डान्स करायचे. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी अनेक अपघात झाले. किकी चॅलेंजला विसरल्यानंतर याच धर्तीवर आता एक नवे चॅलेंज सुरु झाले आहे. सध्या सोशल मीडियात याची चांगलीच चर्चा सुरु आहे. #skibidichallenge असे या चॅलेंजचे नाव असून, यातही फार विचित्र प्रकारे डान्सच करायचा आहे.
लिटिल बिग बॅंडने एक गाणे तयार केले असून, हे गाणे सध्या चांगलेच धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात जी डान्स स्टेप आहे ती लोक एक चॅलेंज म्हणून करु लागले आहेत.
यातील अनके व्हिडीओ हे अतिशय प्रोफेशनल वाटत असून, ते मूळ गाण्याचा पर्याय ठरू शकतात.