फ्रान्सच्या (France) टुलॉन येथे शस्त्रक्रियेचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या विचित्र घटनेत फ्रान्समधील एक वृद्ध व्यक्ती त्याच्या गुदाशयात (Rectum) अडकलेला पहिल्या महायुद्धाचा बॉम्ब (WWI-Era Bomb) काढण्यासाठी रुग्णालयात पोहोचला. गुदाशयातून हा बॉम्ब बाहेर काढण्यासाठी शनिवारी संध्याकाळी ही 88 वर्षीय वृद्ध व्यक्ती दक्षिण फ्रान्समधील टुलॉन येथील सेंट-माऊस हॉस्पिटलमध्ये पोहोचली. या घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी भीतीने तातडीने हॉस्पिटल रिकामे केले.
अहवालानुसार, या व्यक्तीने लैंगिक सुखासाठी गुदद्वारात अशी वस्तू घातल्याचा आरोप आहे. NYPost मधील एका अहवालानुसार, रुग्णालयातील अधिकाऱ्यांना काळजी होती की, रुग्णालयातच या बॉम्बचा स्फोट होईल. त्यामुळे त्यांनी तातडीने बॉम्ब निकामी करणाऱ्या तज्ञांना देखील घटनास्थळी पाचारण केले. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, तपासानंतर बॉम्ब-निकामी करणाऱ्या तज्ञांनी त्यांना आश्वासन दिले की, ती गोष्ट पहिल्या महायुद्धातील असून, ज्याचा वापर फ्रेंच सैन्याने केला होता. आता त्याचा स्फोट होण्याची शक्यता कमी होती.
ही वस्तु जवळजवळ 8 इंच लांब आणि 2 इंच रूंद होती. परंतु ती व्यक्तीच्या शरीरातून बाहेर काढण्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे वृद्ध व्यक्तीच्या पोटातून हा बॉम्ब बाहेर काढला. अहवालानुसार, सध्या या व्यक्तीची प्रकृती स्थिर असून, लवकरच तो शस्त्रक्रियेतून पूर्ण बरा होईल अशी अपेक्षा आहे. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या कारकीर्दीमधील हे सर्वात आगळेवेगळे प्रकरण होते. (हेही वाचा: काय सांगता? लोकप्रिय गायिकेने जाणूनबुजून स्वतःला करवून घेतली Covid-19 ची लागण; समोर आले धक्कादायक कारण)
दरम्यान, याआधी इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या गुदाशयातही असाच धोकादायक बॉम्ब घुसला होता. ही व्यक्ती लष्करातील सदस्य होती. जेव्हा तो आपले घर स्वच्छ करत होता तेव्हा त्याचा पाय घसरला आणि तो खाली त्याच्या पार्श्वभागावर पडला. त्यावेळी हा बॉम्ब त्याच्या गुदद्वारात घुसला. त्यानंतर तो वेदनेने तळमळत रुग्णालयात पोहोचला. सुग्नालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करून हा बॉम्ब बाहेर काढण्यात आला.