Sex With Under Age Boy: 14 वर्षीय मुलासोबत महिला करत होती वर्षापासून अश्लील चाळे, पोलिसांनी केली अटक
अटक/ प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: Facebook)

मेरीलँड (Maryland) येथील फ्रेडरिक (Frederick) येथे राहणाऱ्या एका महिलेला 14 वर्षांच्या मुलाशी लैंगिक संबंध (Sex) ठेवल्याच्या आरोपावरून बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. फ्रेडरिक पोलीस विभागाने एका बातमीत म्हटले आहे की, 43 वर्षीय एव्हलिन गोमेझ गुतिरेझवर (Evelyn Gomez Gutierrez) अल्पवयीन मुलासोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. स्थानिक डॉक्टरांच्या कार्यालयाने संभाव्य लैंगिक संबंधांविषयी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांशी संपर्क साधला होता, ज्यामुळे चौकशीला चालना मिळाली. ( Sex In Open Air: लॉकडाऊनच्या दरम्यान खडकांवर ऑस्ट्रेलियातील कपल्सचे सेक्स, क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावर झाला तुफान राडा )

गुप्तहेरांनी सांगितले की त्यांच्या तपासात असे आढळून आले की गुटिरेझने 2020 च्या दरम्यान अनेकदा अल्पवयीन मुलासोबत लैंगिक संबंध ठेवले आहेत. गुटीरेझला मंगळवारी अटक करण्यात आली. तिच्यावर सेकंड-डिग्री बलात्काराचे दोन आणि थर्ड-डिग्री लैंगिक गुन्ह्यांचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी बॉण्डच्या पुनरावलोकन दरम्यान, न्यायाधीशांनी गोमेझ गुतिरेझला बॉण्डशिवाय अटकेखाली ठेवण्याचे आदेश दिले. तिला पीडित व्यक्तीशी संपर्क साधण्याचीही परवानगी देण्यात आलेली नाही.