Sex In Open Air: लॉकडाऊनच्या दरम्यान खडकांवर ऑस्ट्रेलियातील कपल्सचे सेक्स, क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावर झाला तुफान राडा
प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

सेक्स ऑन द बीच ला नव्या उंचीवर घेऊन जात ऑस्ट्रेलियन जोडप्याने (Australian Couple) उंच खडकाच्या कडावर (Cliff) सेक्स करण्याचा निर्णय घेतला. रॉकवर मॉर्निंग सेक्स करताना पकडलेले हे जोडपे सोशल मीडियावर बऱ्याच जणांचे लक्ष वेधून घेत आहे. फोटोग्राफर स्कॉट रॉबिन्सनने  (Scott Robinson) News.com.au ला सांगितले की, ते सकाळी 8:15 वाजता बोंडीमध्ये स्विमिंग करत होते तेव्हा त्यांनी पाण्यातून त्या जोडप्याचे फोटो काढले. (Money For Sex: 42 वर्षीय शिक्षिकेने विद्यार्थ्याला पाठवले Nude फोटो, यौनसंबंध ठेवण्यासाठी दिली पैशांची ऑफर)

रॉबिन्सनने हा फोटो खाजगी फेसबुक ग्रुप बोंडी लोकल लूपवर पोस्ट केला, ज्यात हे जोडपे नग्न अवस्थेत एका खडकावर सेक्स करताना दिसत आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियन जोडप्याने खडकावर सेक्स केल्याची छायाचित्रे व्हायरल झाली, ज्यामुळे लॉकडाऊन दरम्यान क्वारंटीन प्रोटोकॉल  तोडल्याबद्दल सोशल मीडियावर वाद सुरू झाला.

सिडनी मॉर्निंग हेराल्डने सांगितले की, रॉबिन्सन ऑस्ट्रेलियात नव्याने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन निर्बंधांचा संदर्भ देत होते, ज्यामध्ये अशी अट घालण्यात आली आहे की न्यू साउथ वेल्समधील रहिवासी व्यायाम किंवा इतर आवश्यक कामांशिवाय त्यांचे सरकारी क्षेत्र सोडू शकत नाहीत. शनिवारी राज्यात कोरोना विषाणूची 466 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आल्यानंतर सोमवारी कोविड -19 प्रोटोकॉल लागू करण्यात आला.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर फेसबुक ग्रुपमधून काढून टाकण्यात आला असला तरी ही या फोटोनी सोशल मीडियावर क्वारंटाईन प्रोटोकॉल तोडल्याच्या वादाला तोंड फोडले आहे. अनेकजण प्रश्न विचारत आहेत की समुद्रकिनारी खडकावर लैंगिक संबंध ठेवणे ही लॉकडाऊन मध्ये परवानगी मिळवून केलेली क्रिया होती का ? त्याच वेळी अनेक वापरकर्त्यांनी विनोदाच्या पद्धतीने कमेंट करत या घटनेचा विरोध केला आहे.