महिलांच्या रिप्ड जिन्स घालण्यावरून उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा महिलांनी ट्वीटर वर खरपूस समाचार घेतला आहे. दरम्यान 'रिप्ड जिन्स घालणार्या महिला 'चांगले आदर्श' ठेवत आल्याचं वक्तव्य काल Tirath Singh Rawat यांनी केल्यानंतर त्याचे अनेक स्तरांमधून प्रतिसाद येण्यास सुरूवात झाली. अल्पावधीतच नेटकर्यांनी देखील #RippedJeans सह रिप्ड जिन्स मधील फोटो पोस्ट करण्यास सुरूवात केली आहे. सोबतच महिलांच्या कपड्यांवरून त्यांच्यावर कमेंट्स पास करणार्या पुरूषी अहंकारी वृत्तीवर पुन्हा बोट ठेवण्यात आले आहे. अनेकींनी फोटो शेअर करत मुली घालत असलेल्या कपड्यांचा आणि त्यांच्यावरील संस्कारांचा थेट संबंध जोडणं बंद करण्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान या सोशल मीडियावरील ट्रेंडमध्ये शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) देखील सहभागी झाल्या आहेत. त्यांनी देखील त्यांचा एक फोटो पोस्ट करत तीरथ सिंह रावत (Uttarakhand CM Tirath Singh Rawat) यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. पहा Sara Ali Khan ची अजब फॅशन; जीन्सची किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क.
सोशल मीडीयावर #RippedJeans वरील प्रतिक्रिया
Ripped Jeans aur Kitab.
The country’s ‘sanskriti’ & ‘sanskaar’ are impacted by men who sit and judge women and their choices. Soch badlo Mukhyamantri Rawat ji, tabhi desh badlega. #RippedJeansTwitter pic.twitter.com/qYXcN88fY6
— Priyanka Chaturvedi (@priyankac19) March 18, 2021
प्रियंका चतुर्वेदी यांनी विचार बदला मग देश बदलेल असा सल्ला मुख्यमंत्री रावत यांना दिला आहे.
In solidarity with the woman with the two kids trying to get somewhere who bore the brunt of a clearly sleazy man checking her out because she was wearing ripped jeans. #RippedJeansTwitter pic.twitter.com/N3fWgvlCBD
— Rohini Singh (@rohini_sgh) March 17, 2021
Hello @TIRATHSRAWAT How you doing?#RippedJeansTwitter pic.twitter.com/WGhK9fGQQz
— Greeshma Shukla🏹🚜 (@GreeshmaShukla) March 17, 2021
What a perfect day to flaunt this madness! pic.twitter.com/1KkiwNbB0M
— deepali desai (@desaideepali) March 17, 2021
"A strong woman looks a challenge dead in the eye and gives it a wink."#RippedJeansTwitter pic.twitter.com/ztfgJpyOaM
— Divyanshi (@divyanshi_jain) March 17, 2021
तीरथ सिंह रावत हे आठवड्याभरापूर्वीच उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान त्यांनी रिप्ड जिन्स घालणार्या महिलांवर टिपण्णी करत हे कसले संस्कार असे म्हटलं आणि बघता बघता त्यांच्यावर आता देशभरातून टीका होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान कालपासून रावत हे चर्चेमध्ये आहेत.