कोरोना वायरस जागतिक महामारी (Coronavirus Pandemic) दरम्यान खोटी वृत्त झपाट्याने वायरल होत असल्याचं पहायला मिळालं आहे. यामध्ये आता ओमिक्रॉन (Omicron) वायरसची दहशत असल्याने कोविड संक्रमण रोखण्यासाठी आजपासून देशात 15-18 वयोगटातील मुलांना लस देण्यास सुरूवात झाली आहे. तर 10 जानेवारीपासून प्रिकॉशनरी डोस (Precautions Dose) देण्यात येणार आहे. पण यामध्ये काही मीडीया रिपोर्ट्सकडून आता वापरात असलेल्या लसी या एक्सपायर झालेले डोस असल्याचं सांगण्यात आले होते. पण सरकारने यावर खुलासा करत हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचं म्हटलं आहे.
केंद्र सरकारकडून खुलासा करताना सध्या मुदत संपलेल्या लसी वापरात नसल्याचं सांगितलं जात आहे. The Central Drugs Standard Control Organization कडून भारतामध्ये आता कोवॅक्सिन या भारत बायोटेकच्या लसीच्या शेल्फ लाईफला 9 ते 12 महिन्याची मुदतवाढ दिल्याचं आणि कोविशिल्ड या सीरम इंस्टिट्युटच्या लसीला 6 ते 9 महिन्याची मुदतवाढ दिल्याचं सांगण्यात आलं आहे. हा निर्णय 22 फेब्रुवारी 2021 ला झाल्याचेही स्पष्ट केले आहे. नक्की वाचा: COVID-19 Vaccination For Teenagers: 15-18 वर्षीय मुलांसाठी आजपासून कोविड 19 चे लसीकरण; पहा Co-WIN वर स्लॉट कसा कराल बूक?
ANI Tweet
The Central Drugs Standard Control Organization has approved the extension of shelf life of Covaxin from 9 months to 12 months. Similarly, the shelf life of Covishield has been extended by the National Regulator from 6 months to 9 months on 22nd February 2021: Government of India
— ANI (@ANI) January 3, 2022
भारतामध्ये आज्पासून लहानमुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये केवळ कोवॅक्सिन लसीला परवानगी देण्यात आली आहे. कोवॅक्सिन 28 दिवसांच्या फरकाने दिली जाते. तर सीरम इन्स्टिट्युटची कोविशिल्ड 84 दिवसांच्या फरकाने दिली जाते. या दोन्ही लसींना जागतिक आरोग्य संघटनेकडून परवानगी देण्यात आली आहे.